CoronaVirus :'होम क्वारंटाईन' शक्य नाही मग, संस्थात्मक क्वारंटाईन व्हा! पुण्यात तिघांचा पुढाकार

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 24 मार्च 2020

एकीकडे ​अशी परिस्थिती असताना दुसरीकडे मात्र होम क्वारंटाईनचा सल्ला असलेले काही नागरिक सामाजिक भान ठेवून स्वतःची आणि समाजाची देखील विचार काळजी करत असल्याची काही उदाहरणे समोर आली आहेत.

पुणे : एकीकडे होम क्वारंटाईनचा सल्ला दिला असताना त्याचा भंग नागरिक करीत असल्याचे प्रकार उघडकीस येत आहेत. तर दुसरीकडे असाच सल्ला असलेले. परंतु घरात पुरेशी जागा नाही, आपल्यामुळे दुसऱ्या कोणालाही या विषाणूचा संसर्ग होऊ, याचे सामाजिक भान ठेवून संस्थात्मक क्वारंटाईन करण्यासाठी काही नागरिक स्वतःहून पुढे येत असल्याचे सकारात्मक चित्र पाहवयास मिळत आहे. अशा सुमारे तीन जणांनी पुणे महापालिकेकडे संपर्क साधला आहे.

बातम्या ऐकण्यासाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप
कोरोना विषाणूचा संसर्ग झालेल्या रूग्णांची संख्या वाढत चालली आहे. या विषाणूचा वाढता प्रादुर्भाव रोखण्यासाठी संसर्ग झालेल्या रूग्णाच्या संपर्कात आलेल्याची तपासणी महापालिका आणि जिल्हा प्रशासनाने सुरू केली आहे. अशा नागरिकांना होम क्वारंटाईनचा सल्ला देण्यात येत आहे. परंतु हा सल्ला धुडकावून अनेक जण बाहेर समाजात फिरत आहेत. काहीजण प्रवास देखील करत असल्याचे उघडकीस आले आहे. त्यामुळे प्रशासनाची डोकेदुखी वाढत चालली आहे. असे कोणी आढळल्यास त्यांच्यावर कारवाई करण्याचा इशाराही प्रशासनाने दिला आहे.

Coronavirus : कोरोना व्हायरसची लक्षणे दिसताहेत? घाबरू नका पण...
एकीकडे ​अशी परिस्थिती असताना दुसरीकडे मात्र होम क्वारंटाईनचा सल्ला असलेले काही नागरिक सामाजिक भान ठेवून स्वतःची आणि समाजाची देखील विचार काळजी करत असल्याची काही उदाहरणे समोर आली आहेत. घरी पुरेशी जागा नाही. बाहेर फिरले, तर आपल्यामुळे दुसऱ्याचा जीव धोक्यात येऊ शकतो. याचा विचार करून तीन जणांनी पुणे महापालिकेशी संपर्क साधून संस्थात्मक क्वारंटाईनची मागणी केली आहे. त्यांना तातडीने ही सुविधा पुरविण्यात आली आहे.

Corona Virus : पुणेकरांची मार्केटयार्डात खरेदी-विक्रीसाठी गर्दी; अखेर पोलिसांनी...


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Three People took Initiative for Organizational Quarantine pune