Pune Crime : मंतरवाडी-कात्रज बायपास रोडवर लुटणारे तिघे जेरबंद | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

two arrested

Pune Crime : मंतरवाडी-कात्रज बायपास रोडवर लुटणारे तिघे जेरबंद

उंड्री : मंतरवाडी-कात्रज बायपास रोडवर लुटमार करणाऱ्या तिघांना जेरबंद करून ९७ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. गुन्हे शाखेच्या युनिट-५च्या पथकाने ही कारवाई केली. आरोपींवर हडपसर, लोणीकाळभोर आणि कोंढवा पोलीस स्टेशनमध्ये पाच गुन्हे दाखल असल्याचे तपासात निष्पन्न झाले.

हेही वाचा: विराटपेक्षा भारी ठरतोय रोहित, दुसऱ्या मॅचमध्ये पुन्हा दिसली झलक

प्रफुल भारत कांबळे (वय २१, रा. ससाणेनगर वाईन श़पशेजारी, हडपसर, पुणे), परवेझ हैदरअली इनामदार (वय २०, रा. आदर्शनगर तिरंगा चौक, काळेपडळ, हडपसर, पुणे), विजय बाळू सोनवणे (वय २२, रा. आदर्शनगर, तिरंगा चौक, दर्ग्याशेजारी, जे.एस.पी.एम. कॉलेजच्या पाठीमागे, हडपसर, पुणे) अशी अटक केलेल्यांची नावे आहेत.

पोलिसांनी सांगितले की, तलवारीच्या धाकाने लुटल्याच्या ठिकाणापासून गुन्हे शाखेच्या युनिट-५ पथकाने मंतरवाडी-कात्रज बायपास परिसरात पेट्रोलिंग केली. सूत्रांकडून मिळालेली माहिती आणि तांत्रिक विशेषणाच्याआधारे आरोपींना ताब्यात घेऊन अटक केली. आरोपींकडे अधिक तपास केला असता आरोपींनी चोरीच्या मोटारसायकलचा वापर करून तलवारीच्या धाकाने लुबाडल्याची कबुली दिली. आरोपींकडून ३५ हजार रुपये किमतीची होंडा शाईन मोटारसायकल व ६२ हजार रुपये किमतीचे महागडे पाच मोबाईल जप्त केले असून, आरोपींवर हडपसर-२, लोणीकाळभोर-२ आणि कोंढवा पोलीस स्टेशनमध्ये एक असे पाच गुन्हे दाखल असल्याचे निष्पन्न झाले आहे.

हेही वाचा: काँग्रेसकडून उद्या देशभरात 'किसान विजय दिवस', कार्यक्रमांचं आयोजन

पोलीस आयुक्त अमिताभ गुप्ता, पोलीस सहआयुक्त डॉ. रवींद्र शिसवे, अपर पोलीस आयुक्त रामनाथ पोकळे, पोलीस उपायुक्त श्रीनिवास घाडगे, सहायक पोलीस आयुक्त लक्ष्मण बोराटे यांच्या मार्गदर्शनाखाली गु्न्हे शाखेच्या युनिट-५चे वरिष्ठ पोलीस निरीक्षक हेमंत पाटील, सहायक पोलीस निरीक्षक प्रसाद लोणारे, पोलीस उपनिरीक्षक सोमनाथ शेंडगे, पोलीस अंमलदार रमेश साबळे, दया शेगर, महेश वाघमारे, प्रमोद टिळेकर, विनोद शिवले, अकबर शेख, आश्रुबा मोराळे, चेतन चव्हाण, दीपक लांडगे, विशाल भिलारे, विलास खंदारे, पृथ्वीराज पांडोळे, प्रवीण काळभोर, दाऊद सय्यद, अजय गायकवाड, दत्ता ठोंबरे, अमर उगले, संजयकुमार दळवी, स्नेहल जाधव, स्वाती गावडे यांच्या पथकाने ही कामगिरी केली.

loading image
go to top