

Hard Work Pays Off: NDA Medalists Reflect on Their Remarkable Training Experience
sakal
पुणे: ‘एनडीए’च्या १५०व्या तुकडीच्या दीक्षान्त संचलनात सर्वोत्तम कामगिरी करणाऱ्या छात्रांचा विविध पदके देऊन गौरव करण्यात आला. कठोर प्रशिक्षण, शिस्त, नेतृत्वगुण आणि शैक्षणिक गुणवत्तेच्या जोरावर छात्रांनी विशेष कामगिरी केलेल्या रोहित कौशिक याला राष्ट्रपतींचे सुवर्णपदक, पीयूष रौतेला याला रौप्यपदक आणि साहिल शर्मा याला ब्राँझपदक प्रदान केले. तर ‘चार्ली’ स्क्वॉड्रनला ‘चीफ ऑफ स्टाफ बॅनर’ने गौरविण्यात आले. संचलनानंतर पदकविजेत्या छात्रांनी पत्रकारांशी संवाद साधताना आपल्या तीन वर्षांच्या खडतर प्रशिक्षणाचा आलेख मांडला.