
पिंपरी : धावत्या कारने अचानक पेट घेतला. ही घटना पिंपरीतील काळेवाडी येथे रविवारी (22) दुपारी) एकच्या सुमारास घडली. पेटत्या कारमुळे परिसरातील नागरिका धास्तावले होते. या घटनेत कसलीही जीवितहानी झाली नाही.
काळेवाडीहून पिंपरीकडे येत असलेल्या धावत्या मोटारीने डीमार्ट येथे अचानक पेट घेतला. मोटारीला आग लागल्याचे लक्षात येताच चालक खाली उतरला. काही वेळातच आग पसरली. परिसरात धूरही मोठ्याप्रमाणात पसरला होता.
नाताळच्या सुट्टीमुळे सलग दुसऱ्या दिवशी पुणेकर अडकले कोंडीत
या घटनेची माहिती तातडीने अग्निशमन विभागाला देण्यात आली. काही वेळातच राहाटणी अग्निशमन केंद्राचे जवान घटनास्थळी दाखल झाले. त्यानंतर आग आटोक्यात आणली. यामध्ये मोटारीचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. या घटनेमुळे परिसरातील नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले होते.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.