
पुणे : पुणे शहर, पिंपरी चिंचवड आणि ग्रामीण भागात मिळून पुणे जिल्ह्यातील दिवसभरातील नव्या कोरोना रुग्णांच्या संख्येत कालच्या तुलनेत आज (ता.२८) ४२६ ने घट झाली आहे. यामध्ये पुणे शहरातील १ हजार १३३ जणांचा समावेश आहे. यामुळे पुणे जिल्ह्यातील एकूण रुग्ण संख्येने आज पाऊण लाखाचा आकडा पार केला आहे.
दरम्यान, आज दिवसभरात ५५ रुग्णांचा मृत्यू झाला आहे. यामुळे जिल्ह्यातील एकूण मृत्यूंची संख्या आता १ हजार ७९२ झाली आहे. आज दिवसभरातील एकूण मृत्यूंमध्ये सर्वाधिक ३५ रुग्ण पुणे शहरातील आहेत.
आज पुणे जिल्ह्यातील एकूण रुग्णांची संख्या ७५ हजार ४०० झाली आहे. पुणे शहरातील सर्वाधिक रुग्णांपाठोपाठ पिंपरी चिंचवडमध्येही पुणे शहराच्या बरोबरीनेच १ हजार १३० नवे रुग्ण आढळून आले आहेत. ही संख्या पुणे शहराच्या तुलनेत अवघ्या तीनने कमी आहे.
जिल्हा परिषद क्षेत्रात २३३ आणि नगरपालिका व कॅंटोन्मेंट बोर्डात मिळून १२२ रुग्ण नोंदले गेले आहेत. काल (ता. २७) रात्री ९ वाजल्यापासून आज (ता. २८) रात्री नऊ वाजेपर्यंतची ही आकडेवारी आहे.
आज मृत्यू पावलेल्यांमध्ये शहरातील ३५ रुग्णांच्या पाठोपाठ पिंपरी चिंचवडमधील १३, जिल्हा परिषद कार्यक्षेत्रातील चार आणि कॅंंटोन्मेंट बोर्डातील तीन जणांचा समावेश आहे. दिवसभरात नगरपालिका क्षेत्रातील एकाही रुग्णाचा मृत्यू झालेला नाही.
(Edited by : Sagar Diliprao Shelar)
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.