डोळ्यात मिरची पूड टाकून कोयत्याने वार; हवेली पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल

'आमचा घरगुती विषय आहे, तू लक्ष घालू नको, येथून निघून जा' असे म्हणत धक्काबुक्की करणाऱ्याच्या डोळ्यात मिरची पूड टाकून कोयत्याने सपासप वार करून गंभीर जखमी केल्याची घटना किरकटवाडी येथे घडली.
Murderer Attack
Murderer AttackSakal
Summary

'आमचा घरगुती विषय आहे, तू लक्ष घालू नको, येथून निघून जा' असे म्हणत धक्काबुक्की करणाऱ्याच्या डोळ्यात मिरची पूड टाकून कोयत्याने सपासप वार करून गंभीर जखमी केल्याची घटना किरकटवाडी येथे घडली.

किरकटवाडी - 'आमचा घरगुती विषय आहे तू लक्ष घालू नको, येथून निघून जा' असे म्हणत धक्काबुक्की करणाऱ्याच्या डोळ्यात मिरची पूड टाकून एकाने कोयत्याने सपासप वार करून गंभीर जखमी केल्याची घटना सिंहगड रस्त्याला लागून असलेल्या किरकटवाडी येथे घडली आहे. स्वप्निल मधुकर कांबळे (वय 31, रा. लक्ष्मीनगर, किरकटवाडी) असे जखमी तरुणाचे नाव असून याप्रकरणी राम कचरे (रा. लक्ष्मीनगर, किरकटवाडी) याच्यावर हवेली पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

स्वप्निल कांबळे याची त्याच्या मावस भावासोबत बाचाबाची सुरू होती. त्यावेळी त्यांच्या ओळखीतील राम कचरे तेथे आला व भांडणात मध्यस्थी करु लागला. 'हा आमचा घरगुती विषय आहे तू लक्ष घालू नको, येथून निघून जा' असे म्हणत स्वप्निलने राम कचरे यास धक्काबुक्की केली. त्यावेळी राम कचरे तेथून निघून गेला.

थोड्या वेळाने राम कचरे पुन्हा आला आणि तुला खुप मस्ती आली आहे काय? असे म्हणत त्याने अचानक हातातील मिरची पूड स्वप्निलच्या डोळ्यात टाकली व कोयत्याने सपासप वार करण्यास सुरुवात केली. स्वप्निल ने डोक्यावर हात धरल्याने कोयत्याचे घाव हातावर बसले आहेत. शेजारी उभा असलेला तरुण मधे आल्याने राम कचरे तेथून पळून गेला. याबाबत हवेली पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे मात्र गंभीर दुखापत झालेली असताना पोलिसांनी त्याप्रमाणे गुन्हा करुन घेतला नाही असा आरोप जखमी तरुणाच्या नातेवाईकाने केला आहे.

'धारदार शस्त्राने गंभीर दुखापत केल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तपास सुरू करण्यात आला असून जीवे मारण्याचा उद्देश निष्पन्न झाल्यास त्याप्रमाणे पुढील कार्यवाही करण्याची तजवीज ठेवली आहे.'

- सदाशिव शेलार, पोलीस निरीक्षक, हवेली पोलीस ठाणे, पुणे ग्रामीण.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com