पुणे : टिंबर मार्केट येथे भीषण आग; तीन तासांच्या अथक प्रयत्नानंतर आग आटोक्यात!

सकाळ वृत्तसेवा
रविवार, 22 मार्च 2020

12 फायरगाड्या, 5 देवदूत आणि 3 टँकरच्या साहाय्याने आग आटोक्यात आणण्यात आली. मात्र, नेमकी आग कशामुळे लागली याचे कारण अद्याप अस्पष्ट आहे.

पुणे कॅन्टोन्मेंट : भवानी पेठ टिंबर मार्केट परिसरात रविवारी (ता.२२) भीषण आग लागली होती. अग्निशमन दलाच्या कर्मचाऱ्यांनी वेळीच आग आटोक्यात आणली. मात्र, काही वेळेतच आगीच्या दाहने पुन्हा पेटला. त्यामुळे तीन तास ही आग विझविण्याकरिता मनपा व कॅंटोन्मेंट बोर्डातील अग्निशमन दलाला झुंज द्यावी लागली.

बातम्या ऐकण्यासाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

भवानी पेठ येथे टिंबर मार्केट मध्ये मोठ्या प्रमाणात लाकूड व इतर साहित्यांची मोठी बाजारपेठ  आहे. यावेळी एका एनएसजैन या इलेक्ट्रॉनिक दुकानाला अचानक आग लागल्याने इलेक्ट्रॉनिक वस्तुंनी मोठा पेट घेतला. त्याचबरोबर शेजारील रेशनिंग दुकान व बि-बियाणे खतांचे गोडाऊने  देखील मोठ्या प्रमाणात पेटले.

- Article 144 : जमावबंदी आदेशाचे कलम 144 आहे तरी काय?

या इलेक्ट्रॉनिक गोडाऊनच्या मागे असलेल्या झोपडपट्टीतील सात ते आठ घरे जळाली. यामध्ये त्यांचा संपूर्ण संसार उध्वस्त झाला. वेळीच जयमल्हार मंडळाच्या सामाजिक कार्यकर्त्यांनी जीव धोक्यात टाकून त्या झोपडपट्टीत सिलेंडर व स्फोटक पदार्थ त्वरित बाहेर काढल्याने मोठा अनर्थ  टळला .

- Lockdown : 31 मार्चपर्यंत शहरात जमावबंदी; पोलिसांचा राहणार वॉच!

या घटनेचे वृत्त समजताच उपमहापौर सरस्वती शेंडगे त्वरित घटना स्थळी दाखल झाल्या व त्यांनी झोपडपट्टीत रहिवाशांचे त्वरित तात्पुरती राहण्याची व्यवस्था नजीकच्या मनपाच्या शाळेत केली. व पिढीत लोकांना शक्य तितकी मदत करण्याचे आश्वासन त्यांनी दिले. अग्निशमन दलाच्या जवानांनी विशेष परिश्रम घेतल्याने आग अन्य परिसरात पसरू शकली नाही. अन्यथा मोठ्या प्रमाणात हानी झाली असती. याप्रसंगी कर्फ्यू असताना देखील अनेक सामाजिक कार्यकर्ते मदतीला धावून आले.

- Coronavirus : 'जनता कर्फ्यू'नंतर पंतप्रधानांचे नवे आवाहन; वाचा सविस्तर!

यावेळी अग्निशमनदलाचे अधिकारी  प्रशांत रणपिसे यांनी सांगितले की, सायं 7 वाजून 50 मि. ला आम्हाला कॉल आला. 12 फायरगाड्या, 5 देवदूत आणि 3 टँकरच्या साहाय्याने आग आटोक्यात आणण्यात आली. नेमकी आग कशामुळे लागली याचे कारण अद्याप अस्पष्ट आहे. 

दरवर्षी टिंबर मार्केटमध्ये आग लागते. सदर मार्केटमध्ये एकाही व्यापाऱ्याकडे अग्निशमन दलाची एनओसी दिली जात नाही. कारण हे मार्केट हलविण्याचा प्रश्न प्रलबिंत आहे. शासनाने कात्रजनजीक मोठी जागा दिली असल्याचे समजते. तरी हे मार्केट त्वरित हलवावे, अशी नागरिकांची मागणी आहे.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Timber Market area in Pune city was hited by heavy fire on Sunday

टॅग्स
टॉपिकस
Topic Tags: