आळंदीतील दुभाजक ठरतोय धोकादायक
sakal

आळंदीतील दुभाजक ठरतोय धोकादायक

तळेगाव प्राथमिक आरोग्य केंद्रात लसीकरणचा बूस्टर डोस चालू

आळंदी, ता. २२ : पुणे- आळंदी रस्त्यावर दुभाजकास मोटार पुन्हा एकदा धडकली. गेल्या महिन्याभरात सातव्यांदा अपघाताच्या घटना केवळ अशास्त्रीय पद्धतीने बसविलेल्या दुभाजकामुळे झाल्याने गाडी मालकांचे विनाकारण नुकसान होत असल्याचे चित्र आहे.
चाकण चौकातून आलेली ब्रिझा मोटार गुरुवारी (ता. २१) रात्री नविन पुलालगतच्या रस्त्यावरील दुभाजकाला धडकली. या अपघातात मोटारीचा पुढील भाग पूर्ण चेंबला गेला. अशाचप्रकारे गेल्या महिनाभरात यापूर्वी सहावेळा गाड्या धडकल्या.
आळंदी-पुणे रस्त्यावर धाकट्या पादुका ते नविन पूल आणि वाय जंक्शन ते जुना पुलादरम्यान तीर्थक्षेत्र विकास आराखड्यातून रस्ता रुंदीकरण करून दुभाजक बसविले. मात्र, सुरवातीपासूनच तांत्रिक दोष कामामध्ये आहे. अनेक ठिकाणी दुभाजकांमध्ये स्थानिक व्यापाऱ्यांच्या सांगण्यावरून अंतर ठेवल्याने अपघात होत आहे. तसेच, देहू फाटा, धाकट्या पादुका, वाय जंक्शन या ठिकाणी दुभाजकास समोरील बाजूने रेडियम व रेड सिग्नल न बसविल्याने रात्रीच्यावेळी हमखास गाड्या धडकत आहेत. अनेक ठिकाणी गाड्या धडकल्याने दुभाजकही तुटलेले आहे. वस्तुतः वाहतुकीचा रस्ता असूनही नविन पुलावरील स्ट्रीट लाईन बहूतांशवेळा बंद असते. त्यामुळे याठिकाणी दुभाजक दिसून येत नाही. नागरिकांचे आणि वाहनाचे नुकसान टाळण्यासाठी आळंदी पालिकेने दुभाजकाची दुरुस्ती करून वाहनचालकास दुभाजक दिसण्यासाठी दुभाजकास रेडिअम आणि रेड सिग्नल बसविण्याची मागणी होत आहे.

आळंदीतील दुभाजक ठरतोय धोकादायक
शिक्रापुरात नियम मोडणाऱ्यांकडून ४८ हजार दंड वसूल

बूस्टर(booster dose)डोस नुकताच देण्यात आला आहे. रांजणगाव गणपती प्राथमिक आरोग्य केंद्राच्या वैद्यकीय अधिकारी स्नेहल घोडेराव यांनी बूस्टर डोस घेण्याचे आवाहन शिक्षकांना केले आहे. दरम्यान, तळेगाव ढमढेरे येथील प्राथमिक आरोग्य केंद्रामार्फतही ज्यांचे दोन डोस होऊन ९ महिने पूर्ण झाले आहेत, अशा नागरिकांना लसीकरणाचा बूस्टर डोस चालू असून, शिक्षकांनी बूस्टर डोसचा लाभ घेण्याचे आवाहन येथील वैद्यकीय अधिकारी संध्या कारंडे यांनी केले आहे. तालुका आरोग्य अधिकारी डॉ दामोदर मोरे यांच्या मार्गदर्शनाखाली तळेगाव प्राथमिक आरोग्य केंद्रात लसीकरणचा बूस्टर डोस चालू आहे. तसेच, परिसरातील सर्व शाळांतील नववी ते बारावीच्या बहुतांश विद्यार्थ्यांना लसीकरणाचा पहिला डोस दिला असल्याचे डॉ. कारंडे यांनी सांगितले.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com