Pune Crime News
Pune Crime Newssakal

Pune Crime News : जागेच्या वादातून बालवडीत मृतदेहाची विटंबना

बालवडी (ता. भोर) येथील ज्येष्ठ महिलेच्या अंत्यविधीनंतर अर्धवट जळालेला मृतदेह बाहेर काढून फेकून मृतदेहाची विटंबना केल्याप्रकरणी भोर पोलिसांनी नेरे (ता. भोर) येथील तरुणावर गुन्हा दाखल केला.

भोर : बालवडी (ता. भोर) येथील ज्येष्ठ महिलेच्या अंत्यविधीनंतर अर्धवट जळालेला मृतदेह बाहेर काढून फेकून मृतदेहाची विटंबना केल्याप्रकरणी भोर पोलिसांनी नेरे (ता. भोर) येथील तरुणावर गुन्हा दाखल केला. प्रकाश सदुभाऊ बढे (रा. नेरे) असे गुन्हा दाखल केलेल्या तरुणाचे नाव असून, रविवारी (ता. २४) होळीच्या दिवशी सायंकाळी साडेसहाच्या सुमारास जागेच्या वादातून ही घटना घडली.

बालवडी ग्रामपंचायतीच्या सरपंच सुवर्णा किंद्रे यांची सासूबाई ताराबाई आनंदा किंद्रे यांचे रविवारी निधन झाले. सायंकाळी सहाच्या सुमारास बालवडीच्या स्मशानभूमीत त्यांच्यावर अंत्यसंस्कार केले. अंत्यसंस्कारानंतर सर्वजण घरी गेले. सायंकाळी साडेसहाच्या सुमारास गावच्या बसथांब्याजवळ छोटे हॉटेल असलेल्या प्रकाश बढे याने स्मशानभूमीत जळत असलेला मृतदेह लाकडाच्या साहाय्याने बाहेर काढून फेकला आणि जळत असलेली लाकडेही इतरत्र फेकून दिली. रस्त्यावरून जाणाऱ्या काही व्यक्तींनी याची माहिती ग्रामस्थांना दिली.

बालवडीच्या ग्रामस्थांनी घटनास्थळी धाव घेतली असता त्यांना तिथे बढेची टोपी आढळली. त्यास विचारपूस केली असता तो पळून जाऊ लागला. त्यामुळे ग्रामस्थांनी त्याला चोप दिला. त्या झटापटीत बढेच्या हॉटेलला आग लागली. त्यात हॉटेलमधील सर्व सामान जळाले. बालवडी आणि नेरे गावचे अनेक ग्रामस्थ तेथे जमा झाले. त्यामुळे तणावाचे वातावरण निर्माण झाले.

Pune Crime News
Solapur Loksabha Constituency : सोलापूर लोकसभेसाठी युवा आमदारांमध्ये लढत ; आ. प्रणिती शिंदे व आ. राम सातपुते

दरम्यान, भोर पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक अण्णासाहेब पवार हे घटनास्थळी दाखल झाले. त्यामुळे ग्रामस्थ शांत झाले. पोलिसांनी जखमी प्रकाश बढे यास उपचारासाठी रुग्णालयात दाखल केले. भोर नगरपालिकेच्या अग्निशामक बंबाच्या मदतीने हॉटेलची आग शमवली.

याबाबत अक्षय विजय किंद्रे यांनी पोलिसांत फिर्याद दाखल केली. त्यानुसार पोलिसांनी बढेवर गुन्हा दाखल केला. स्मशानभूमीजवळ प्रकाश बढे याची शेती व हॉटेल आहे. त्यामुळे स्मशानभूमीच्या जागेच्या वादातून हा प्रकार घडला असल्याचे पोलिसांनी सांगितले. भोरचे पोलिस उपनिरीक्षक अनिल चव्हाण हे पुढील तपास करीत आहेत.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com