बारामतीचे उपविभागीय अधिकारी नावडकर यांची बदली

बारामतीचे उपविभागीय अधिकारी नावडकर यांची बदली
Published on

बारामती, ता. २९ : येथील उपविभागीय अधिकारी वैभव नावडकर यांची बदली झाली असून त्यांच्या जागी मिरज येथील उपविभागीय अधिकारी उत्तम दिघे यांची नियुक्ती करण्यात आली आहे.
या संदर्भातील अध्यादेश प्रसिद्ध झाला असून तात्काळ प्रभावाने उत्तम दिघे यांना बारामती उपविभागीय अधिकारी म्हणून कार्यभार स्वीकारण्यास सांगण्यात आले आहे. बारामती विधानसभेचे प्रतिनिधी व राज्याचे दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे अपघाती निधन झाल्यानंतर बारामती विधानसभा मतदारसंघाची पोटनिवडणूक जाहीर झाली आहे. या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर नावडकर यांचा तीन वर्षांचा कालावधी पूर्ण झाला असल्याकारणाने ही बदली राज्य निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार करण्यात आली असल्याचे सूत्रांकडून समजते. त्यांनी तीन वर्षांत प्रशासनाला गती देण्याचे प्रयत्न केले होते. उत्तम दिघे यांना तत्काळ बारामतीचा कार्यभार स्वीकारण्याचे निर्देश शासकीय स्तरावरून देण्यात आले आहेत. नावडकर यांना अद्याप नियुक्ती देण्यात आली नसून येत्या दोन-तीन दिवसांत त्यांच्या नियुक्तीचे आदेश जारी होण्याची शक्यता आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com