लाईव्ह न्यूज

धोकादायक ऊस वाहतुकीमुळे अपघाताचा धोका

धोकादायक ऊस वाहतुकीमुळे अपघाताचा धोका
Published on: 

कानगाव, ता.३ : दौंड तालुक्यातील पाटस व कानगाव परिसरात दोन तसेच तीन ट्रॉलीतून होणारी उसाची परावर्तक न लावताच वाहतूक होत आहे. धोकादायक वाहतुकीमुळे अपघाताला निमंत्रण मिळत आहे. नागरिकांची जिवाला धोका निर्माण झाला आहे. यामुळे पोलिस प्रशासनाने बेशिस्त ट्रॅक्टर चालकांवर कारवाई करावी, अशी मागणी नागरिकांमधून होत आहे.

पाटस येथील मुख्य रस्त्यापासून जवळच पोलिस चौकी आहे. मात्र, तरीही पोलिस चौकीसमोरून उसाची धोकादायक वाहतूक सुरू आहे. दौंड तालुक्यात उसाच्या शेतीचे प्रमाण जास्त आहे. उसाची प्रामुख्याने गुऱ्हाळघराकडून वाहतूक केली जाते. सध्या परिसरात ऊस तोडणी मोठ्या प्रमाणात सुरू आहे. ट्रॅक्टरच्या साहाय्याने येथील परिसरातून उसाची वाहतूक सुरू आहे.


उसाच्या धोकादायक वाहतुकीमुळे वाहनचालकांना आपला जीव मुठीत घेऊन चालावे लागते. तसेच मागील ट्रॉलीत उसाच्या मोळ्यांवर ऊसतोड कामगार व लहान मुले बसलेली असतात. कित्येकदा उसाने भरलेली ट्रॉली रस्त्यातच उलटते. कधी ट्रॉलीची पिन तुटून अपघात होतात. यातील बहुतांश ट्रॅक्टरला पाठीमागून रिफ्लेक्टर नसल्याने अंधारात या ट्रॉलीवर दुचाकीस्वार येऊन धडकतात. मोठ्या वाहनांचेही अपघात होतात.


यामुळे अपघाताचा धोका अधिक
१. विना नंबरप्लेट, रात्रीच्या अंधारात रिफ्लेक्टर (परावर्तक) न लावता धोकादायक पद्धतीने वाहतूक सुरू असते.
२. उसाची अवजड वाहतूक करताना चालक मोठ्या आवाजात गाणी लावून रस्त्यावरून डबल अथवा तीन ट्रॉलीचा ट्रॅक्टर सुसाट चालवतात. ३. ऊस वाहतूक करणारे ट्रॅक्टरचालक मागील वाहनांची फिकीर न करता, दोन ते तीन ट्रॉल्या धोकादायक पद्धती रस्त्यांमधून चालवतात.
४. मागील वाहनांनी कितीही हॉर्न वाजवला तरी स्पीकरच्या आवाजाने त्यांना ऐकू येत नाही.
५. पाठीमागील उसाने भरलेली ट्रॉली झोक घेत रस्त्यातून चाललेली असते.

वाहतुकीवर निर्बंधाची मागणी
कानगावर परिसरातील खासगी गुऱ्हाळ चालक व पोलिस प्रशासनाने ट्रॅक्टर चालकांना वेगाची मर्यादा, कर्णकर्कश गाणी, मर्यादेपेक्षा अवजड वाहतूक यावर योग्य ते निर्बंध घालावेत. नियम न पाळणाऱ्या चालकांवर कायदेशीर कारवाई करावी, अशी मागणी पाटस व कानगाव परिसरातील ग्रामस्थांकडून होत आहे.
00496

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com