
फुलवडे, ता. १४ : फुलवडे (ता. आंबेगाव) ग्रामपंचायतीअंतर्गत असलेल्या गणेशवाडी, भगतवाडी, गभालेवाडी, दांडेवाडी, उघडेवाडी, बरकीदरा, हिलेवाडी, मोहरेवाडी, नंदकरवाडी, माकडवाडी, वनदेववस्ती, मुरंबावस्ती, लोहकरेवस्ती आदी वाड्यावस्त्यांवर पाणी टंचाई निर्माण झाली आहे. याठिकाणी टॅंकरने पाणीपुरवठा सुरू असल्याची माहिती सरपंच बबन मोहरे यांनी दिली.
डिंभे धरणापासून पुढे पाच किलोमीटर अंतरावर फुलवडे हे गाव धरण पाणलोट क्षेत्राच्या जवळच आहे. परंतु जसजसे धरणाचे पाणी कमी होत जाते. तसतसे पाण्याचे स्रोत अटू लागतात. त्यामुळे विहिरी, कूपनलिका, बंधारे तसेच बरकीदरा येथे असलेल्या पाझर तलावात पाणी शिल्लक राहत नाही. यामुळे ग्रामस्थांना उन्हाळ्यात काही महिने पाण्याचा प्रश्न भेडसावतो. यामुळे आंबेगाव पंचायत समितीस प्रस्तावानुसार दरवर्षी या भागात दिवसाआड पाण्याचे टँकर सुरू करण्यात येतात.
दरम्यान, ‘हर घर जल’ योजनेअंतर्गत गावात जलजीवनची जलवाहिनी व टाकीचे बांधकाम केले आहे, मात्र, या जलवाहिनीतून अद्याप पाणीपुरवठा सुरू झालेला नाही. यामुळे ग्रामस्थांना पाण्याची प्रतिक्षा करावी लागत आहे.
03970
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.