murder case
murder case sakal

Mumbai : सासऱ्याकडून सुनेचा खून; पण शवविच्छेदन अहवालात ती...

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, संशयित आरोपी कोळी याचे शेजारच्या गावातील एका महिलेशी अनैतिक संबंध होते. या संबंधांना त्याची सून मेघा या सातत्याने विरोध करत होती.

राजगुरुनगर - सासऱ्याचे शेजारच्या गावातील महिलेशी अनैतिक संबंध होते. त्या संबंधांना सून सतत विरोध करत असल्याने सासऱ्याने सात वर्षांच्या नातीसमोरच सुनेचा गळा आवळून आणि तोंड दाबून खून केल्याची घटना मंगळवारी खेड तालुक्यातील वाफगावच्या कुरणेवस्ती येथे घडली. मेघा रंगनाथ कोळी (वय ३४) असे मृत सुनेचे नाव आहे. तर, दिनकर मल्हारी कोळी (वय ५५) असे संशयित आरोपी असलेल्या सासऱ्याचे नाव आहे.

murder case
Pune Theater : पुणे शहरातील नाट्यगृह सुधारणेचा ‘प्रयोग’; विविध कामांसाठी कोट्यवधींचा निधी

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, संशयित आरोपी कोळी याचे शेजारच्या गावातील एका महिलेशी अनैतिक संबंध होते. या संबंधांना त्याची सून मेघा या सातत्याने विरोध करत होती. मंगळवारी संध्याकाळी साडेपाचच्या सुमारास याबाबत पुन्हा सून मेघा त्याला बोलली. तेव्हा घरी कोणी मोठी व्यक्ती नाही, असे पाहून त्याने सुनेचा गळा आवळून आणि तोंड दाबून खून केला. मेघा हिची सात वर्षांची मुलगी आर्या हिच्यासमोरच ही घटना घडली.

murder case
Mumbai-Goa Highway : टोल वसुलीविरोधात ठाकरे गट आक्रमक; प्रशासनाला दिला थेट इशारा

तिने पोलिस जबाबात ही माहिती दिली आहे. तसेच, शवविच्छेदन अहवालात वैद्यकीय अधिकाऱ्यांनी गळा आवळल्याने मृत्यू झाल्याचा अहवाल दिला आहे.
या प्रकरणी पोलिस हवालदार बाळकृष्ण साबळे यांनी फिर्याद दिली असून, तीवरून खेड पोलिसांनी दिनकर कोळी याच्यावर खुनाचा गुन्हा दाखल करून त्याला अटक केली. न्यायाधीशांनी त्याला दोन दिवसांची पोलिस कोठडी दिली. मृत महिलेच्या खुनामुळे तिच्या तीन मुली पोरक्या झाल्याने परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com