

इंदापूर, ता. २२ : इंदापूर तालुक्यातील महात्मा फुलेनगर (बिजवडी) येथील कर्मयोगी शंकररावजी पाटील सहकारी साखर कारखाना व शहाजीनगर येथील नीरा भीमा सहकारी साखर कारखान्याकडून गळीत हंगाम सन २०२३-२४ साठी गाळप झालेल्या ऊस बिलाचा दिवाळीसाठी प्रतिटन २०० रुपयांप्रमाणे हप्ता शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये मंगळवारी (ता. २१) वर्ग केला, अशी माहिती ‘कर्मयोगी’चे संचालक राजवर्धन पाटील व ‘नीरा भीमा’चे अध्यक्ष लालासाहेब पवार यांनी दिली.
इंदापूर येथे आयोजित पत्रकार परिषदेत राजवर्धन पाटील यांनी सांगितले की, माजी मंत्री हर्षवर्धन पाटील यांच्या नेतृत्वाखाली हे दोन्ही कारखाने उत्कृष्टरीत्या कार्यरत आहेत. या दोन्ही कारखान्यांनी यापूर्वी शेतकऱ्यांना प्रतिटन २७०० रुपयांप्रमाणे ऊस बिलाची रक्कम अदा केलेली आहे. कर्मयोगी व नीरा भीमा कारखान्याच्या संचालक मंडळाच्या बैठकीत शेतकऱ्यांना ऊस बिलाचा दीपावलीसाठी प्रतिटन २०० रुपयांप्रमाणे हप्ता देण्याचा निर्णय घेण्यात आला. तसेच, या दोन्ही कारखान्याच्या कर्मचाऱ्यांना एक महिन्याचा पगार बोनस म्हणून दिवाळीसाठी देण्यात येणार आहे. आगामी सन २०२४-२५ च्या गळीत हंगामासाठी दोन्ही कारखाने सज्ज झाले आहेत. आगामी गळीत हंगाम यशस्वी करण्यासाठी सर्वांनी सहकार्य करावे.
या दोन्ही कारखान्यांमध्ये कामगारांचे पगार नियमितपणे होत आहेत. मात्र, गैरसमज निर्माण केला जातो. कारखान्याची बदनामी केली जात आहे. कारखान्यासंदर्भात चुकीच्या गोष्टी करू नका, या संस्था शेतकऱ्यांच्या आहेत, असे आवाहन यावेळी राजवर्धन पाटील यांनी केले.
याप्रसंगी नीरा भीमा कारखान्याचे संचालक विलासराव वाघमोडे यांनी मनोगत व्यक्त केले. यावेळी दोन्ही कारखान्याचे संचालक मंडळ, कार्यकारी संचालक उपस्थित होते.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.