Pune News
Pune Newssakal

Pune News : पोल्ट्रीची भिंत अंगावर पडून लोणी येथे दोन मुलांचा मृत्यू

लोणी काळभोर (ता. हवेली) हद्दीतील पांडवदंड परिसरात बंद पोल्ट्रीची भिंत अंगावर पडून दोन मुलांचा जागीच मृत्यू झाला.

उरुळी कांचन : लोणी काळभोर (ता. हवेली) हद्दीतील पांडवदंड परिसरात बंद पोल्ट्रीची भिंत अंगावर पडून दोन मुलांचा जागीच मृत्यू झाला. ही घटना गुरुवारी (ता. २१) दुपारी घडली. यश मयूर काळभोर (वय १४, रा. पांडवदंड रोड, कदमवाकवस्ती, ता. हवेली) व प्रथमेश संदीप बोरुडे (वय १५ रा. मूळ रा. देवकर वस्ती वार्ड नंबर ७, श्रीरामपूर, नगर) अशी मृत्यू झालेल्या मुलांची नावे आहेत. यश काळभोर हा टायग्रीस स्कूल या शाळेत आठवीत शिकत होता तर प्रथमेश बोरुडे लोणी काळभोर येथील पृथ्वीराज कपूर मेमोरिअल हायस्कूलमध्ये नववीत शिकत होता.

मागील दोन दिवसांपासून मयूर काळभोर यांच्या पोल्ट्रीच्या साफसफाईचे काम सुरू होते. त्यामुळे पोल्ट्रीवरील पत्रे काढून ठेवले होते. यावेळी मयूर, सुनील चव्हाण या दोघांसह यश व प्रथमेश हे चौघे साफसफाई करत होते. गुरुवारी (ता. २१) दुपारी एक वाजण्याच्या सुमारास अचानक भिंत कोसळली. यात यश आणि प्रथमेश भिंतीखाली गाडले गेले. स्थानिकांच्या मदतीने त्यांना बाहेर काढले. त्यांना खासगी रुग्णालयात दाखल केले, मात्र दोघांचेही निधन झाल्याचे डॉक्टरांनी सांगितले. ता. २१ : लोणी काळभोर (ता. हवेली) हद्दीतील पांडवदंड परिसरात बंद पोल्ट्रीची भिंत अंगावर पडून दोन मुलांचा जागीच मृत्यू झाला. ही घटना गुरुवारी (ता. २१) दुपारी घडली.

यश मयूर काळभोर (वय १४, रा. पांडवदंड रोड, कदमवाकवस्ती, ता. हवेली) व प्रथमेश संदीप बोरुडे (वय १५ रा. मूळ रा. देवकर वस्ती वार्ड नंबर ७, श्रीरामपूर, नगर) अशी मृत्यू झालेल्या मुलांची नावे आहेत. यश काळभोर हा टायग्रीस स्कूल या शाळेत आठवीत शिकत होता तर प्रथमेश बोरुडे लोणी काळभोर येथील पृथ्वीराज कपूर मेमोरिअल हायस्कूलमध्ये नववीत शिकत होता.

Pune News
'Eli' Elephant : ‘एली’ हत्तीण देणार प्राणी संवर्धनाचे धडे

मागील दोन दिवसांपासून मयूर काळभोर यांच्या पोल्ट्रीच्या साफसफाईचे काम सुरू होते. त्यामुळे पोल्ट्रीवरील पत्रे काढून ठेवले होते. यावेळी मयूर, सुनील चव्हाण या दोघांसह यश व प्रथमेश हे चौघे साफसफाई करत होते. गुरुवारी (ता. २१) दुपारी एक वाजण्याच्या सुमारास अचानक भिंत कोसळली. यात यश आणि प्रथमेश भिंतीखाली गाडले गेले. स्थानिकांच्या मदतीने त्यांना बाहेर काढले. त्यांना खासगी रुग्णालयात दाखल केले, मात्र दोघांचेही निधन झाल्याचे डॉक्टरांनी सांगितले.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com