Eli' Elephant
Eli' Elephantsakal

'Eli' Elephant : ‘एली’ हत्तीण देणार प्राणी संवर्धनाचे धडे

ॲनिमॅट्रोनिक तंत्रज्ञानाच्या आधारे तयार करण्यात आलेली ‘एली’ ही हत्तीण आता शहरातील चिमुकल्यांना प्राणी संवर्धनाचे धडे देणार आहे.

पुणे : ॲनिमॅट्रोनिक तंत्रज्ञानाच्या आधारे तयार करण्यात आलेली ‘एली’ ही हत्तीण आता शहरातील चिमुकल्यांना प्राणी संवर्धनाचे धडे देणार आहे. ‘पीपल फॉर एथिकल ट्रीटमेंट ऑफ ॲनिमल्स’ (पेटा इंडिया) आणि फ्रिडा आर्ट हाऊस यांच्यातर्फे हा शैक्षणिक उपक्रम हाती घेण्यात आला आहे.

रविवारपर्यंत (ता. २४) येरवडा येथील हॉटेल रिट्ज कार्लटन येथे असलेल्या फ्रिडा आर्ट हाऊस या ठिकाणी ‘एली’ हत्तीणीला सकाळी ११.३० ते दुपारी १२.३० आणि दुपारी २.३० ते सायंकाळी ५.३० या दरम्यान भेटता येणार आहे. मुलांसाठी ही भेट विनामूल्य असून ही हत्तीण या भेटीत मुलांशी संवाद साधेल.

या संवादात ‘एली’ उपस्थित विद्यार्थ्यांशी तिच्यासमोरील आव्हाने, संकटे आणि तिचे अनुभव कथन करेल. अभिनेत्री दिया मिर्झाच्या आवाजात या हत्तीणीचा प्रवास उलगडेल. ‘एली’ ही ६.५ फूट उंच असून ॲनिमॅट्रोनिक तंत्रज्ञानाद्वारे तिची निर्मिती करण्यात आली आहे.

Eli' Elephant
Pune City News : शहरात अवजड वाहनांना प्रवेशास बंदी

आशियातील हा पहिलाच प्रयत्न आहे. विद्यार्थ्यांमध्ये प्राणी कल्याण आणि संवर्धनाविषयी जागरूकता यावी, हा या उपक्रमामागील उद्देश असल्याचे फ्रिडा आर्ट हाऊसच्या संस्थापिका श्रद्धा गीते यांनी सांगितले.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com