मायदेशी परतलेल्यांनी घेतला मोकळा श्‍वास
Sakal

मायदेशी परतलेल्यांनी घेतला मोकळा श्‍वास

देशात १८ वर्षांपेक्षा जास्त वयाच्या नागरिकांचे लसीकरण या वर्षी १६ जानेवारीपासून सुरू केले आहे. आतापर्यंत देशात ६८.८१ टक्के लसीकरण पूर्ण झाले.

पुणे - शहरातील प्रत्येक सहापैकी पाच मुलांमध्ये (Child) कोरोना (Corona) विरोधातील प्रतिकारशक्ती (Immunity) तयार झाली आहे. पाच ते अठरा या वयोगटात केलेल्या अभ्यासातून ही माहिती पुढे आली.

देशात १८ वर्षांपेक्षा जास्त वयाच्या नागरिकांचे लसीकरण या वर्षी १६ जानेवारीपासून सुरू केले आहे. आतापर्यंत देशात ६८.८१ टक्के लसीकरण पूर्ण झाले. पण, लहान मुलांच्या लसीकरणाबाबत केंद्र सरकारने नुकताच निर्णय घेतला आहे.

या पार्श्वभूमिवर शहरात केलेल्या एका अभ्यासातून ८० टक्के मुलांमध्ये कोरोनाच्या विषाणूंचा प्रतिकार करण्याची क्षमता निर्माण झाल्याचा निष्कर्ष निघाला आहे. त्यामुळे या मुलांना यापूर्वी कोरोनाचा संसर्ग झाला असल्याचे स्पष्ट होते.

या बद्दल डी. वाय पाटील वैद्यकीय महाविद्यालयातील बालरोग विभागाचे प्रमुख डॉ. शरद आगरखेडकर म्हणाले, ‘‘पहिल्या आणि दुसऱ्या लाटेत लहान मुलांना कोरोनाचा संसर्ग झाल्याचे प्रमाण कमी असल्याचे दिसते. मात्र, घरातील कोणत्या न कोणत्या व्यक्तीला कोरोना झाला होता. किंवा परिसरातील नागरिकांना कोरोनाचे निदान झाले होते. त्यामुळे त्यांच्या संपर्कात आलेल्या लहान मुलांमध्ये कोरोनाला प्रतिकार करण्याची क्षमता निर्माण झाली. या ८० टक्के मुलांमध्ये कोरोनाच्या विरोधातील प्रतिपिंडे (अँटिबॉडीज) तयार झाल्याचे असल्याचे अभ्यासातून दिसले.’’

देशातील ६७.६ टक्के नागरिकांमध्ये कोरोनाविरोधी प्रतिकारशक्ती निर्माण झाल्याचे ‘भारतीय वैद्यक संशोधन परिषद’ने (आयसीएमआर) जूनमध्ये प्रसिद्ध केलेल्या अहवालात नमूद केले आहे. तितक्याच प्रमाणात लहान मुलांमध्येही कोरोनाला प्रतिकार करण्याची शक्ती निर्माण झालेली आहे.

- डॉ. प्रमोद जोग, माजी अध्यक्ष, बालरोग तज्ज्ञ संघटना

यांना द्या प्राधान्य

  • लठ्ठ मुलं

  • मधुमेही

  • कुपोषित

  • दिव्यांग

  • तीव्र स्वरूपाचा दमा

तज्ज्ञ म्हणतात

  • मुलांमध्ये कोरोनाला प्रतिकार करण्याची शक्ती निर्माण झाली

  • ओमिक्रॉनला प्रतिबंध करण्यासाठी लस आवश्यक

  • विविध प्रकारच्या विषाणूंस प्रतिकार करण्यासाठी लस गरजेची

  • ७० टक्के मुलांमध्ये प्रतिकारशक्ती

  • मुलांना कोरोना संसर्ग झाल्यास पालकांचा धोका वाढतो

  • योग्य वेळेत निदान आणि उपचार न झाल्यास आरोग्याच्या पायाभूत सुविधांवर ताण

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com