'व्यायामा'पूर्वी जाणून घ्या आपली बलस्थाने.. | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

exercise
'व्यायामा'पूर्वी जाणून घ्या आपली बलस्थाने..

'व्यायामा'पूर्वी जाणून घ्या आपली बलस्थाने..

पुणे : कोरोनाच्या तिसऱ्या लाटेमुळे मानसिक आणि शारीरिक तंदुरुस्तीबद्दल पुणेकर पुन्हा खडबडून जागे झाले आहेत. योग वर्गाचे ऑनलाइन क्लास सुरू झाले तसेच, रस्त्यावर भल्या पहाटे थंडीत फिरायला आणि पळायला बाहेर पडणाऱ्यांची संख्यादेखील वाढल्याचे सहजतेने दिसते. हे निश्चितच स्वागतार्ह आहे. पण, व्यायामाला सुरुवात करताना आपली बलस्थाने आणि कमकुवत दुवे नेमकेपणाने ओळखता यायला हवेत.(Know your strengths before exercise)

हेही वाचा: कोरोना 20 मिनिटांनंतर होतो 90% ने कमी संसर्गजन्य; संशोधनातून आलं समोर

‘सायकलिंग’, ‘रनिंग’, ‘स्वीमिंग’ अशा कोणत्याही व्यायामाची सुरुवात शास्त्रीय पद्धतीने होणे आवश्यक असते. त्यातून क्रीडा प्रकारातील दुखापती निश्चित कमी करता येतात. नव्याने व्यायामाला सुरुवात करणाऱ्यांसाठी ‘ट्रेन युवर हार्ट विथ सायंटिफिक एक्सरसाईज’ (टीएच-एसई) (Train your Heart with Scientific Exercise)हा अभिनव उपक्रम पुण्यातील आलोहा क्लिनिकने सुरू केला. त्याचे उद्‍घाटन ‘सकाळ’चे मुख्य कार्यकारी अधिकारी उदय जाधव यांच्या हस्ते झाले. या वेळी हृदयरोग तज्ज्ञ डॉ. ऋतुपर्ण शिंदे, डॉ. अश्विनी जोशी, डॉ. मिलिंद गजेवार, आहारतज्ज्ञ डॉ. अवंती दामले आदी उपस्थित होते.

हेही वाचा: ओमिक्रॉनचा भारतात एक बळी,जगात किती? आरोग्य मंत्रालयानं केलं स्पष्ट

या प्रसंगी डॉ. शिंदे म्हणाले, ‘‘व्यायामाच्या मागचे शरीरशास्त्र समजून घेणे आवश्यक आहे. प्रत्येक वयोगटनिहाय हृदयामध्ये कोणते आणि कसे बदल होतात, याची प्राथमिक माहिती घेणे आवश्यक आहे. व्यायाम करताना प्रत्येकाचा कमाल आणि किमान व्यायामाचा ‘झोन’ वेगळा असतो. त्यासाठी प्रत्येकाने ‘व्हीओ २ मॅक्स’ आणि ‘लॅकटेक थ्रोशोल्ड’ या चाचण्या करणे आवश्यक आहे.’’ या वेळी ‘कार्डिओपल्मोनरी रिसुसिटेशन’ (सीपीआर) प्रशिक्षण देण्यात आले. शास्त्रीय दृष्टिकोनातून व्यायामाचे प्रशिक्षण दर महिन्याला देण्यात येणार आहे. पुढील प्रशिक्षण रविवार (ता. २३ जानेवारी) राजा मंत्री मार्गावरील आलोहा क्लिनिकमध्ये सकाळी नऊ वाजता होईल.(Health News)

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
loading image
go to top