Dentral Treatment
Dentral TreatmentSakal

डेंटल टुरिझममध्ये पुण्याचे पाऊल पडते पुढे!

दंतोपचार हा केवळ आजारापुरता उपचार राहिलेला नाही तर, तो आकर्षक व्यक्तिमत्त्वासाठी आवश्यक एक घटकही झाला आहे. त्यामुळेच दंतोपचारांची क्रेझ वाढती आहे.
Summary

दंतोपचार हा केवळ आजारापुरता उपचार राहिलेला नाही तर, तो आकर्षक व्यक्तिमत्त्वासाठी आवश्यक एक घटकही झाला आहे. त्यामुळेच दंतोपचारांची क्रेझ वाढती आहे.

- प्रतीक्षा जाधव

पुणे - दंतोपचार (Teeth Treatment) हा केवळ आजारापुरता उपचार राहिलेला नाही तर, तो आकर्षक व्यक्तिमत्त्वासाठी आवश्यक एक घटकही झाला आहे. त्यामुळेच दंतोपचारांची क्रेझ (Craze) वाढती आहे. परंतु, पुण्या-मुंबईत डेंटिस्टची (Dentist) संख्या मोठी असल्यामुळे परदेशातून येथे येऊन खास उपचार घेणाऱ्यांचीही संख्या वाढू लागली आहे. त्यामुळे पुण्याच्या बहुविध लौकिकात ‘डेंटल टुरिझम’चीही (Dental Tourism) भर पडली आहे. परदेशातील दरांच्या तुलनेत येथे किफायतशीर दरात दंतोपचार होत असल्यामुळे ही क्रेझ वाढती असल्याचे या क्षेत्रातील तज्ज्ञांचे म्हणणे आहे.

कॉस्मेटिक दंतोपचार हा सौंदर्य राखण्याचा एक घटक आहे. परिपूर्ण स्मित तयार करण्याच्या दृष्टिकोनातूनच नाही तर चेहऱ्यावरील सौंदर्य वाढविण्यासाठीही तो फायदेशीर ठरत आहे. कॉस्मेटिक दंतोपचारांमध्ये अनेक प्रकार आहेत. दातांवरील डाग काढून टाकणे, दात पांढरे करणे, दातांमधील अंतर भरणे, डेंटल इम्प्लांट, क्राऊन, ऑर्थोडॉन्टिक्स ही सर्व कॉस्मेटिक दंतोपचारांची उदाहरणे आहेत.

कॉस्मेटिक दंतचिकित्सा करण्यासाठी परदेशातून भारतात रुग्ण १५-२० दिवस उपचार घेण्यासाठी येतात. परदेशात प्रत्येक प्रक्रियेसाठी लागणारा खर्च भारताच्या तुलनेत अधिक आहे. त्यामुळे, येथे येऊन उपचार घेणे परवडत असल्याचे परदेशातील लोक सांगतात. अमेरिका, कॅनडा, इंग्लंड, तसेच युरोपातील अनेक देशांतून आपल्या देशात येतात.

- डॉ. निखिल कदम (बीडीएस)

Dentral Treatment
पुणेकरांसाठी दिलासा; कोरोना रुग्ण संख्या वेगाने होतेय कमी

आपला देश हा डेंटल टुरिझमसाठी एक चांगला पर्याय म्हणून पुढे आला आहे. कारण आपल्याकडे कमी खर्चात चांगल्या दर्जाचे उपचार होतात. देशातील अनेक डेंटिस्ट जागतिक दर्जाच्या संस्थांतून उच्चशिक्षण येथे परतातत. त्याचाही रुग्णांना फायदा होतो. डेंटल बाँडिंग ही सर्वांत लोकप्रिय कॉस्मेटिक दंत प्रक्रिया आहे. २०१७ मधील सर्व कॉस्मेटिक प्रक्रियेमध्ये ४३ टक्के लोकांनी डेंटल बाँडिंग केली आहे.

- डॉ. पलक जैन, (एमडीएस)

असा आहे खर्च...

वेनिअर्स

भारत : ८,२५०-१५,०००

अमेरिका : ६५,५०० रुपये

क्राऊन

भारत : ५,२५० - १५,०००

अमेरिका : ९०,०००

रूट कॅनल

भारत : ६,७५० - ९,०००

अमेरिका : ५६,२५०

टूथ इम्प्लांट

भारत : ३०,००० - ६१,५००

अमेरिका : ३,००,०००

अमेरिकन अकॅडमी ऑफ कॉस्मेटिक डेंटिस्ट्री (एएसीडी) ने कॉस्मेटिक उपचार अहवाल नुकताच प्रकाशित केला. त्यामध्ये रुग्णांनी दंतोपचार करण्यामागे कोणती कारणे आहेत याचा समावेश आहे. सर्वेक्षणात समोर आलेली करणे :

१. ८६ टक्के रुग्णांना त्यांचे हास्य सुधारायचे होते.

२. काहींनी महत्त्वाच्या कार्यक्रमासाठी दंतोपचारांचा लाभ घेतला. या अहवालात विवाहसोहळ्यांचे उदाहरण खूप रुग्णांनी सांगितले.

३. काही रुग्णांना दुखापत झाली होती आणि पूर्वीसारखा चेहरा दिसण्यासाठी दंतोपचार घेतले.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com