Sakal Natya Mahotsav
Sakal Natya Mahotsavsakal

Sakal Natya Mahotsav : सकाळ नाट्य महोत्सवाचा पडदा आज उघडणार

राज्याचे सांस्कृतिक कार्यमंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्या हस्ते याचे उद्‍घाटन

पुणे : रंगदेवता आणि नाट्यरसिकांच्या साक्षीने रंगभूमीचा उत्सव साजरा करणाऱ्या ‘सकाळ नाट्य महोत्सवा’चा पदडा उद्या (ता. १८) उघडणार आहे. रंगपंढरी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या ‘बालगंधर्व रंगमंदिरा’त रात्री ९.३० वाजता महोत्सवाला प्रारंभ होईल.

राज्याचे सांस्कृतिक कार्यमंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्या हस्ते याचे उद्‍घाटन होईल. तसेच त्यांच्या हस्ते रंगभूमीवरील अतुलनीय योगदानासाठी ज्येष्ठ अभिनेते डॉ. मोहन आगाशे यांना ‘सकाळ जीवनगौरव पुरस्कार’ प्रदान करण्यात येईल.

Sakal Natya Mahotsav
Sakal Natya Mahotsav : नाट्य महोत्सवाची रसिकांसाठी पर्वणीच; काहीच तिकिटे शिल्लक

महोत्सवाच्या पहिल्या दिवशी, उद्‍घाटनानंतर गौरी थिएटरनिर्मित आणि प्रशांत दामले फॅन फाउंडेशननिर्मित ‘सारखं काहीतरी होतंय’ हे धमाल विनोदी नाटक सादर होणार आहे. रंगभूमीवरील ज्येष्ठ अभिनेते प्रशांत दामले यात प्रमुख भूमिकेत असून, त्यांची आणि ज्येष्ठ अभिनेत्री वर्षा उसगावकर यांची जोडी यानिमित्ताने ३६ वर्षांनंतर पुन्हा एकत्र आली आहे.

युवा लेखक-दिग्दर्शक व अभिनेता संकर्षण कऱ्हाडे यांनी याचे लेखन व दिग्दर्शन केले आहे.
येत्या १८ ते २२ मेदरम्यान बालगंधर्व रंगमंदिरात दररोज रात्री ९.३० वाजता हा नाट्य महोत्सव रंगणार आहे.

या महोत्सवाचे मुख्य प्रायोजक ‘वरद प्रॉपर्टी सोल्युशन्स प्रा. लि.’ हे आहेत, तर महोत्सवाचे ‘पॉवर्ड बाय’ प्रायोजक ‘लोकमान्य मल्टिपर्पज को-ऑप. सोसायटी लि.’ हे आहेत. या महोत्सवात ‘सारखं काहीतरी होतंय’, ‘एका लग्नाची पुढची गोष्ट’, ‘संगीत देवबाभळी’, ‘नियम व अटी लागू’ आणि ‘तू तू मी मी’ ही पाच नाटके सादर होणार आहेत.

Sakal Natya Mahotsav
SAKAL Workshop: निर्यातक्षम शेवगा लागवडीद्वारे वाढवा आर्थिक उत्पन्न; रविवारी नाशिकमध्ये विशेष कार्यशाळा

विद्यार्थ्यांसाठी भरघोस सवलत
नाट्य महोत्सवाच्या सर्वच तिकिटांवर सवलत देण्यात आली आहे. मात्र विद्यार्थ्यांसाठीही भरघोस सवलत उपलब्ध आहे. प्रत्येक नाटकाच्या बाल्कनीतील तिकिटांवर विद्यार्थ्यांना तब्बल ५० टक्के सूट मिळणार आहे. यासह इतर सर्वच तिकिटांवरदेखील वीस टक्के सवलत देण्यात आली आहे.

तिकिटांचे दर (प्रतिव्यक्ती) ः
संपूर्ण महोत्सवाचे तिकिट (तळमजला) ः रुपये १८००
संपूर्ण महोत्सवाचे तिकिट (बाल्कनी) ः रुपये १२००
प्रतिनाटक तिकिट (तळमजला) ः रुपये ४००
प्रतिनाटक तिकिट (बाल्कनी) ः रुपये ३००

Sakal Natya Mahotsav
Sakal Natya Mahotsav : नाट्य महोत्सवाची रसिकांसाठी पर्वणीच; काहीच तिकिटे शिल्लक

तिकिटे मिळण्याची ठिकाणे व वेळ ः
१) बालगंधर्व रंगमंदिर, जंगली महाराज रस्ता ः सकाळी ९.३० ते रात्री ९
२) यशवंतराव चव्हाण नाट्यगृह, कोथरूड ः सकाळी ९.३० ते रात्री ९
३) फोन बुकिंग - ९५९५८३०५५५
४) संकेतस्थळ - ‘बुक माय शो’

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com