Pune
PuneSakal

Pune: खासगी क्लासचालक, महाविद्यालयांना सरकार शिकविणार ‘धडा’

बहुतेककरून शहरी भागात हे पेव फुटले आहे. या प्रकरणी ‘सकाळ’ने २७ जून २०२३ रोजी बातमी प्रसिद्ध केली होती.

पुणे - कनिष्ठ महाविद्यालयांना अचानक भेटी देऊन विद्यार्थ्यांची हजेरी तपासण्यासाठी शिक्षण विभागातर्फे लवकरच पावले उचलण्यात येणार आहेत. त्यामुळे आता कनिष्ठ महाविद्यालयात विद्यार्थ्यांची असणारी गैरहजेरी अन्‌ खासगी शिकवणी वर्गात असणारी भरघोस हजेरी असे हे कनिष्ठ महाविद्यालये आणि खासगी क्लासचालक यांच्यातील संगनमताचे पितळ लवकरच उघडे पडणार आहे. कनिष्ठ महाविद्यालये आणि खासगी क्लास चालक यांच्यातील संगनमताने विद्यार्थी महाविद्यालयात प्रवेश घेतात आणि विद्यार्थ्यांची हजेरी खासगी शिकवणी वर्गात असते.

Pune
Pune Crime : घरफोडीतील दागिने विकण्यासाठी आलेल्या चोरट्यास अटक

बहुतेककरून शहरी भागात हे पेव फुटले आहे. या प्रकरणी ‘सकाळ’ने २७ जून २०२३ रोजी बातमी प्रसिद्ध केली होती. ‘सकाळ’ने दिलेल्या बातमीची दखल घेत विधानसभेच्या पावसाळी अधिवेशनातही नगर जिल्ह्यातील आमदार लहू कानडे यांनी खासगी शिकवणी चालकांचे पेव फुटल्याचा मुद्दा प्रश्नोत्तरात उपस्थित केला. अखेर शिक्षण विभागाने खडबडून जागे होत, कनिष्ठ महाविद्यालयांची तपासणी करण्याचे ठरविले आहे.

अशी आहे स्थिती
- जेईई, नीट, सीईटी यांसारख्या प्रवेश परीक्षांच्या तयारीसाठी विद्यार्थ्यांचा ओढा खासगी शिकवणी वर्गाकडे असतो.
- इयत्ता अकरावी-बारावीत नियमित महाविद्यालयात जाण्यापेक्षा अनेक विद्यार्थी खासगी शिकवणीला जाणे पसंत करतात.

- कनिष्ठ महाविद्यालये आणि खासगी क्लास चालकांच्या संगनमत राजरोसपणे सुरू झाल्याचे दिसून येते.
- महाविद्यालयात विद्यार्थ्यांची ७५ टक्के उपस्थिती बंधनकारक असते.
- विद्यार्थी महाविद्यालयांऐवजी खासगी शिकवणीला हजेरी लावत असल्याचे वास्तव आहे.
- आता कनिष्ठ महाविद्यालय आणि खासगी क्लास चालक यांच्यातील लागेबांधे मोडून काढण्यासाठी शिक्षण विभागाने पुढाकार घेतला आहे.

Pune
Pune Parking : मेट्रोस्थानकाजवळ वाहनतळासाठी जागेचा शोध घेण्यासाठी समिती

बहुसंख्य कनिष्ठ महाविद्यालयात विद्यार्थ्यांची उपस्थिती नसल्याची वस्तुस्थिती आहे. माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण संचालकांनी दिलेल्या आदेशानुसार विशेष पथकामार्फत काही महाविद्यालयांची अचानकपणे तपासणी करण्यात येणार आहे.
- राजेंद्र आहिरे, शिक्षण उपसंचालक, पुणे विभागीय

Pune
Pune News : अनधिकृत वजन काट्यांवर करणार कारवाई - डी. जी. महाजन

कनिष्ठ महाविद्यालयात विद्यार्थ्यांची ७५ टक्के उपस्थिती अनिवार्यच आहे. परंतु महाविद्यालयांमध्ये विद्यार्थ्यांची उपस्थिती नियमित नसल्याच्या तक्रारी येत आहेत. याची दखल घेऊन संबंधित तक्रारींचे निराकरण करण्याची कार्यवाही शिक्षणाधिकारी, शिक्षण उपसंचालक, शिक्षण सहसंचालक यांनी करावी, अशा सूचना दिल्या आहेत.

तक्रारीचे स्वरूप पाहून उपलब्ध यंत्रणेचा वापर करून ही कार्यवाही करण्यात यावी. तसेच कनिष्ठ महाविद्यालयांची अचानकपणे तपासणी करावी, असेही सांगितले आहे.
- संपत सूर्यवंशी, संचालक, माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण विभाग

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com