Shrikant Deshpande
Shrikant Deshpandesakal

Shrikant Deshpande : औद्योगिक आस्थापनांना पुरस्काराने सन्मानित करणार ; श्रीकांत देशपांडे

‘‘शहरी भागातील मतदानाचे प्रमाण वाढविण्यासाठी औद्योगिक आस्थापनांचे (कंपन्या) सहकार्य महत्त्वाचे आहे. कामगारांचे अधिक प्रमाणात मतदान असलेल्या औद्योगिक आस्थापनांना पुरस्काराने सन्मानित करण्यात येईल

पुणे : ‘‘शहरी भागातील मतदानाचे प्रमाण वाढविण्यासाठी औद्योगिक आस्थापनांचे (कंपन्या) सहकार्य महत्त्वाचे आहे. कामगारांचे अधिक प्रमाणात मतदान असलेल्या औद्योगिक आस्थापनांना पुरस्काराने सन्मानित करण्यात येईल,’’ असे प्रतिपादन अपर मुख्य सचिव तथा राज्याचे मुख्य निवडणूक अधिकारी श्रीकांत देशपांडे यांनी केले.

औद्योगिक आस्थापनांच्या प्रतिनिधींसमवेत चर्चा करताना ते बोलत होते. या वेळी उपजिल्हा निवडणूक अधिकारी मीनल कळसकर, स्वीप समन्वयक अधिकारी तथा उपजिल्हाधिकारी अर्चना तांबे, महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाच्या प्रादेशिक अधिकारी सचिन बारवकर, अर्चना पाठारे आदी उपस्थित होते.

देशपांडे म्हणाले, ‘‘शहरी भागातील मतदानाचे प्रमाण वाढविण्यासाठी शाळा-महाविद्यालयांमध्ये विविध उपक्रम घेत आहोत. औद्योगिक आस्थापनांनी मतदान करण्यासाठी कामगारांना प्रोत्साहित करावे. त्यांना मतदार नोंदणी, मतदार यादीतील नाव किंवा पत्त्यातील तपशीलात बदल करणे, मतदार यादीतील नाव वगळणे आदींबाबत माहिती द्यावी. निवडणुकीनंतर झालेल्या मतदानाची माहिती द्यावी, त्यानुसार चांगले काम करणाऱ्या औद्योगिक आस्थापनांना पुरस्कार देण्यात येईल.’’

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com