Raigad Ropeway
Raigad Ropewaysakal

Raigad Ropeway : ‘रायगड रोप-वे’चा स्विस कंपनीबरोबर करार

‘रायगड रोप -वे’मधून प्रवास करणाऱ्या प्रवाशांच्या अधिक सुरक्षिततेसाठी मिलेनियम रोप-वे कंपनीने स्विर्त्झलंडमधील इमॉस कंपनीशीही नुकताच सहकार्याचा करार केला.

पुणे : ‘रायगड रोप -वे’मधून प्रवास करणाऱ्या प्रवाशांच्या अधिक सुरक्षिततेसाठी मिलेनियम रोप-वे कंपनीने स्विर्त्झलंडमधील इमॉस कंपनीशीही नुकताच सहकार्याचा करार केला.
रायगड किल्ल्यावर ‘रोप-वे’ची सुविधा पुरविणाऱ्या मिलेनियम रोप-वे कंपनीचे व्यवस्थापकीय संचालक राजेंद्र जोग यांनी याबाबतची माहिती पत्रकार परिषदेत दिली.

ते म्हणाले, ‘‘रायगड रोप-वेमधून गेल्या २८ वर्षांत ३५ लाख प्रवाशांची वाहतूक झाली आहे. रोप-वे रेस्क्यू आणि इव्हॅक्युएशन तंत्रज्ञानामध्ये जगात ‘इमॉस’ आघाडीवर आहे. ६०हून अधिक देशांत त्यांची सेवा पुरविली जाते. रोप-वे क्षेत्रात वेगाने बदल होत आहेत. खबरदारीचा उपाय म्हणून इमॉसबरोबर करार करण्यात आला आहे. त्यांच्या तंत्रज्ञांकडून देखभाल दुरुस्तीबरोबच जागतिक दर्जाचे प्रशिक्षणही मिळणार आहे.’’

Raigad Ropeway
Pune Municipal Corporation : हयगय करणाऱ्या अधिकाऱ्यांवर कारवाई

केंद्र सरकारने ‘पर्वतमाला परियोजना’ हा विकास कार्यक्रम आखला असून, त्याद्वारे देशात आगामी पाच वर्षांत २०० हून अधिक रोप-वे उभारण्यात येणार आहेत. त्यासाठी सध्याचे सर्व आणि आगामी रोप-वे प्रकल्पांचे ऑडिट, प्रवासी सुरक्षा, सुरक्षा आणि इव्हॅक्युएशन सिस्टीम आदींवर अधिक लक्ष केंद्रित केले जात आहे. त्यामुळे इमॉसशी करार करण्यात आला आहे, अशी माहिती जोग यांनी दिली. तंत्रज्ञानात होत असलेल्या बदलांचा मागोवा घेऊन रायगड रोप-वेमध्येही बदल होत असल्याचे त्यांनी नमूद केले.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com