RTE News
RTE Newssakal

RTE News : शाळा प्रवेशाची वयोमर्यादा निश्‍चित ; तीन वर्षे पूर्ण झालेली बालके ‘नर्सरी’साठी पात्र

शिक्षण हक्क कायद्यांतर्गत (आरटीई) खासगी शाळांमधील २५ टक्के राखीव जागांवरील प्रवेशासाठी प्राथमिक शिक्षण संचालनालयाने किमान आणि कमाल वयोमर्यादा निश्‍चित केली आहे.

पुणे : शिक्षण हक्क कायद्यांतर्गत (आरटीई) खासगी शाळांमधील २५ टक्के राखीव जागांवरील प्रवेशासाठी प्राथमिक शिक्षण संचालनालयाने किमान आणि कमाल वयोमर्यादा निश्‍चित केली आहे. त्यानुसार, प्ले ग्रुप किंवा नर्सरीसाठी ३१ डिसेंबर २०२४पर्यंत किमान तीन वर्षे आणि कमाल चार वर्षे पाच महिने, तर इयत्ता पहिलीसाठी किमान सहा वर्षे आणि कमाल सात वर्षे पाच महिने अशी वयोमर्यादा ठरविली आहे.

नव्या शैक्षणिक वर्षातील प्रवेशाची प्रक्रिया सुरू होते त्यावेळी पूर्व प्राथमिकमधील प्ले ग्रुप/नर्सरी, लहान गट (ज्युनिअर केजी), मोठा गट (सीनियर केजी)मध्ये नेमक्या कोणत्या वयोगटातील बालकांचा प्रवेश घ्यायचा, याबाबत पालकांमध्ये संभ्रम असतो. परंतु, पालकांची बालकांच्या वयोगटानुसार शाळाप्रवेशाची चिंता प्राथमिक शिक्षण संचालनालयाने दूर केली आहे.

RTE News
Pune Municipal Corporation : हयगय करणाऱ्या अधिकाऱ्यांवर कारवाई

‘आरटीई’नुसार खासगी शाळांमध्ये आर्थिकदृष्ट्या दुर्बल आणि वंचित घटकातील विद्यार्थ्यांना असणाऱ्या २५ टक्के राखीव जागांवरील प्रवेशासाठी शैक्षणिक वर्ष २०२४-२५मध्ये बालकांचे शाळा प्रवेशाचे किमान वय किती असावे, हे यापूर्वीच केले आहे. परंतु, प्रवेश प्रक्रिया अधिक सुलभ होण्यासाठी प्राथमिक शिक्षण विभागातर्फे बालकांच्या किमान आणि कमाल वयोगटानुसार त्यांना कोणत्या इयत्तेत प्रवेश दिला जावा, हे स्पष्ट करण्यात आले आहे.

तसेच, शाळा प्रवेशासाठी बालकाचे किमान वय निश्‍चित करताना, जुलै ते डिसेंबरमध्ये जन्मलेल्या बालकांचे शैक्षणिक नुकसान होऊ नये, यासाठी ३१ डिसेंबरपर्यंतचे वय ग्राह्य धरण्यात येते. या संदर्भात सप्टेंबर २०२०मध्येच निर्णय घेण्यात आला आहे. त्या आधारेच बालकांची वयोमर्यादा निश्‍चित केल्याची माहिती प्राथमिक शिक्षण विभागाने दिली आहे.

२०२४ -२५ या शैक्षणिक वर्षात बालकांच्या प्रवेशाची वयोमर्यादा

प्रवेशाचा वर्ग ३१ डिसेंबर २०२४ रोजी किमान वय ३१ डिसेंबर २०२४ रोजी कमाल वय

प्ले ग्रुप/नर्सरी ३ वर्षे ४ वर्षे ५ महिने ३० दिवस

लहान गट (ज्युनिअर केजी) ४ वर्षे ५ वर्षे ५ महिने ३० दिवस

मोठा गट (सीनियर केजी) ५ वर्षे ६ वर्षे ५ महिने ३० दिवस

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com