Land Selling
Land Sellingsakal

Land Selling : ‘आरे’ची जागा विकण्याचा आरोप ; राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षातर्फे आंदोलन

वाकडेवाडी येथील आरे दूध संघाच्या १६ एकर जागा विकण्याचा डाव असल्याचा आरोप करत राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्यावतीने सोमवारी (ता. १८) आरे दूध संघाच्या प्रवेशद्वारासमोर आंदोलन करण्यात आले.

पुणे : वाकडेवाडी येथील आरे दूध संघाच्या १६ एकर जागा विकण्याचा डाव असल्याचा आरोप करत राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्यावतीने सोमवारी (ता. १८) आरे दूध संघाच्या प्रवेशद्वारासमोर आंदोलन करण्यात आले. या आंदोलनात पक्षाच्या कार्यकर्त्यांनी मोठ्या संख्येने सहभाग घेत राज्य सरकारविरोधात घोषणा दिल्या.

पक्षाचे शहराध्यक्ष प्रशांत जगताप यांच्या नेतृत्वाखाली हे आंदोलन करण्यात आले. या वेळी उदय महाले, गणेश नलावडे, राजू साने, रमीज सैयद, रोहन पायगुडे, प्रसाद गावडे, आशा साने, किशोर कांबळे, स्वप्नील जोशी, दिलशाद आतार, हेमंत बधे आदी उपस्थित होते.

Land Selling
Raigad Ropeway : ‘रायगड रोप-वे’चा स्विस कंपनीबरोबर करार

जगताप म्हणाले, ‘‘ राज्यातील दूध उत्पादक शेतकऱ्यांना हक्काची बाजारपेठ मिळावी व जनतेला सकस दूध पुरवठा व्हावा, यासाठी यशवंतराव चव्हाण यांनी आरे दूध संघासाठी जागा दिली होती. नंतर राजकीय नेत्यांनीच स्वतःचे दूध संघ काढल्याने आरे दूध संघ डबघाईला आला. याच आरे दूध संघाची वाकडेवाडी येथे १६ एकर जागा असून त्याची किंमत कोट्यवधी रुपयांच्या घरात आहे. ही जमीन कवडीमोल भावात कोणाला विकण्याचे पाप शिंदे-पवार-फडणवीस सरकार करत आहे? ही जागा त्यांच्या मालकीची नसून पुणेकरांच्या मालकीची आहे.’’

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com