Loksabha Election 2024
Loksabha Election 2024sakal

Loksabha Election 2024 : विजय शिवतारेंना आवर घाला ; राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या बैठकीत पदाधिकाऱ्यांकडून मागणी

राष्ट्रवादी काँग्रेस पक्षासह मित्र पक्षाच्या उमेदवारांना अधिकाधिक मतदान कसे होईल, त्यांचीही मते कशी मिळतील, कोणावर कोणत्या जबाबदाऱ्या सोपवाव्यात, जाहीरनाम्यात कोणत्या स्थानिक प्रश्‍नांना प्राधान्य द्यावे, अशा विविध मुद्द्यांचा आढावा घेत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या बैठकीत लोकसभा निवडणुकीच्या रणनीतीवर चर्चा करण्यात आली.

पुणे : राष्ट्रवादी काँग्रेस पक्षासह मित्र पक्षाच्या उमेदवारांना अधिकाधिक मतदान कसे होईल, त्यांचीही मते कशी मिळतील, कोणावर कोणत्या जबाबदाऱ्या सोपवाव्यात, जाहीरनाम्यात कोणत्या स्थानिक प्रश्‍नांना प्राधान्य द्यावे, अशा विविध मुद्द्यांचा आढावा घेत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या बैठकीत लोकसभा निवडणुकीच्या रणनीतीवर चर्चा करण्यात आली. बैठकीत पदाधिकाऱ्यांनी विजय शिवतारे यांच्याकडून होणाऱ्या टीकेला आवर घालण्याची मागणी केली, त्यावर ‘मुख्यमंत्र्यांच्या कानावर घातले आहे, ते प्रश्‍न सोडवतील’ असा दावा उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केला.

लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पक्षातर्फे मंगळवारी बैठक झाली. पवार यांनी उपस्थितांशी संवाद साधत त्यांच्या सूचना ऐकून घेतल्या. तटकरे म्हणाले, ‘‘पक्षाचे आमदार, खासदार, मंत्री, प्रवक्ते यांच्यावर लोकसभा मतदारसंघांच्या जबाबदाऱ्या निश्‍चित करण्यात आल्या. विधानसभा मतदारसंघाच्याही जबाबदाऱ्यांचे नियोजन केले आहे. प्रमुख नेते, स्टार प्रचारक हे महायुतीच्या उमेदवारांच्या प्रचारामध्ये उतरणार आहेत. त्यासाठी मतदारसंघातही प्रचाराची यंत्रणा राबविण्यात आली आहे.’’

Loksabha Election 2024
Pune Water Problem : पुण्याला दोन महिने पुरेल इतकेच पाणी ; धरणसाठ्यात घट

‘आमच्यावर प्रेम करणाऱ्या विरोधी गटाच्या मंडळींना सुनेत्रा पवार यांच्या उमेदवारीची भीती वाटत आहे. त्यामुळे या गटानेच बारामती लोकसभा मतदारसंघाबाबत महादेव जानकर यांच्या बातम्या पेरल्या आहेत,’ अशा शब्दांत तटकरे यांनी राष्ट्रवादी कॉंग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांचे नाव न घेता त्यांच्यावर टीका केली. जानकर महायुतीत सहभागी झाले असून, त्यांना कुठला मतदारसंघ द्यायचा, याची घोषणा दोन दिवसांत होईल, असेही त्यांनी प्रसारमाध्यमांशी बोलताना सांगितले.

तटकरे म्हणाले...

  • नाशिक लोकसभेसाठी छगन भुजबळ यांनी चर्चा करणे, हा त्यांचा अधिकार

  • साताऱ्याच्या जागेबाबत आमची चर्चा सुरू

  • शिवाजीराव आढळराव पाटील हे सक्षम उमेदवार

  • जागावाटप, अदलाबदलीबाबत चर्चा सुरू

  • राजकारणात सर्व शक्‍यता असू शकतात

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com