Ajit Pawar
Ajit Pawarsakal

Ajit Pawar : भाजप आपला थोरला भाऊ : अजित पवार

भाजप हा आपला थोरला भाऊ आहे. त्यांच्यासह घटकपक्षाच्या कार्यकर्त्यांना बरोबर घेऊन काम करा,’’ अशा सूचना राष्ट्रवादी कॉंग्रेसचे अध्यक्ष अजित पवार यांनी बुधवारी (ता. २७) खडकवासल्यातील नेत्यांना दिल्या.

पुणे : ‘भाजप हा आपला थोरला भाऊ आहे. त्यांच्यासह घटकपक्षाच्या कार्यकर्त्यांना बरोबर घेऊन काम करा,’’ अशा सूचना राष्ट्रवादी कॉंग्रेसचे अध्यक्ष अजित पवार यांनी बुधवारी (ता. २७) खडकवासल्यातील नेत्यांना दिल्या. या मतदारसंघात महायुतीच्या उमेदवाराचे चिन्ह घड्याळ आणि पुण्यात कमळ असल्याचे जनतेपर्यंत पोहोचवा, अशा सूचनाही त्यांनी या वेळी दिल्या.

बारामती लोकसभा मतदारसंघातील खडकवासला विधानसभा मतदारसंघातील पक्षाच्या नगरसेवकांची बैठक पवार यांनी आज सकाळी घेतली. या वेळी महिला आयोगाच्या अध्यक्षा रूपाली चाकणकर, शहराध्यक्ष दीपक मानकर यांच्यासह दिलीप बराटे, अप्पा रेणुसे, दत्ता धनकवडे, युवराज बेलदरे, शैलेश चरवड, अक्रूर कुदळे यांच्यासह अनेक आजी-माजी नगरसेवक उपस्थित होते.

Ajit Pawar
Pune Traffic : धायरी मुख्य रस्त्यावर वाहतूक कोंडी ठरलेली ; वाहतूक कोंडीत अतिक्रमणची भर

या बैठकीत बारामती मतदारसंघातून सुनेत्रा पवार याच महायुतीच्या उमेदवार असतील, असे संकेत अजित पवार यांनी दिले.
महायुतीच्या नेत्यांची गुरुवारी बैठक होणार असून, त्यामध्ये उमेदवारी जाहीर होईल. पत्रके तयार आहेत, ते घरोघरी जाऊ द्या, काय अडचण असेल, तर माझ्याशी संपर्क साधा. प्रचाराची पातळी खाली घसरू देऊ नका. बारामती आणि शिरूर येथे घड्याळ, तर पुणे लोकसभा मतदार संघात कमळ हे चिन्ह आहे. हे लोकांपर्यंत पोहोचवा, अशा सूचना पवार यांनी बैठकीत दिल्या.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com