Pune Traffic : धायरी मुख्य रस्त्यावर वाहतूक कोंडी ठरलेली ; वाहतूक कोंडीत अतिक्रमणची भर

प्रचंड प्रमाणात वाढलेली वाहतूक, पादचाऱ्यांची गर्दी, रस्त्यावरची अतिक्रमणे आणि बेशिस्त रिक्षा चालक यामुळे धायरी मुख्य रस्त्यावर सकाळी आणि संध्याकाळी वाहतूक कोंडी ठरलेली असून नागरिकांना त्यामुळे मन:स्ताप होत आहे.
Pune Traffic
Pune Trafficsakal

धायरी : प्रचंड प्रमाणात वाढलेली वाहतूक, पादचाऱ्यांची गर्दी, रस्त्यावरची अतिक्रमणे आणि बेशिस्त रिक्षा चालक यामुळे धायरी मुख्य रस्त्यावर सकाळी आणि संध्याकाळी वाहतूक कोंडी ठरलेली असून नागरिकांना त्यामुळे मन:स्ताप होत आहे. धायरी फाट्यापासून गारमाळ, रायकर नगर, गणेश नगर,धायरी गाव तसेच 'डीएसके विश्व'कडे जाणारा रस्ता अशा सर्व भागात पथारी,हातगाड्या यांची अतिक्रमणे झाली आहेत. सलग असा पदपथ या संपूर्ण मार्गावर नसल्याने पादचाऱ्यांना रस्त्यावरुन चालावे लागते.

अनेकवेळा रुग्णवाहिका आणि त्यामध्ये असणाऱ्या रुग्णांना वाहतूक कोंडीला सामोरे जावे लागत आहे.अर्धा तास रुग्णवाहिकेला वाहतूक कोंडीत अडकून पडावे लागत आहे. वाहतूक पोलिस देखील हतबल होत आहे. भाजी-फळ विक्रेते, पथारीधारक रस्त्यालगत जागा मिळेल तेथे व्यवसाय थाटतात. त्यामुळे वाहतुकीसाठी पुरेशी जागाच उपलब्ध होत नाही. बेशिस्त रिक्षाचालक मागून येणाऱ्या वाहनांची कोणतीही फिकीर न करता प्रवासी घेण्यासाठी मध्येच थांबून राहतात.त्यामुळे मागील वाहतूक साचून राहू लागते. रिक्षाचालक मनमानी पद्धतीने कोठेही थांबतात. यामुळे अडथळा होऊन वाहतुकीची कोंडी होते.

सकाळ आणि संध्याकाळी  मोठ्या प्रमाणावर वाहतूक कोंडी होत असते ..अर्धा अर्धा तास ऑफिसला जाण्यास उशिर होतो. त्यामुळे मानसिक त्रास सहन करावा लागतो..

-रमेश कदम नागरिक ,धायरी

धायरी फाटा ते उंबऱ्या गणपती चौका दरम्यान अनेक अपघात झाले आहे. पदपथ सलग नसल्याने नागरिक रस्त्यावर उतरून मुख्य रस्त्यावरून चालत जातात. सर्रास रस्त्यावर दुतर्फा वाहने पार्किंग केली जातात त्यामुळे देखील वाहतूककोंडी होते..

-ज्योती सकट, स्थानिक महिला

Pune Traffic
Pune Water Problem : पुण्याला दोन महिने पुरेल इतकेच पाणी ; धरणसाठ्यात घट

प्रत्येक चौकात पोलिस अंमलदार नेमलेले असून वाहतूक नियमन करण्यात येते. तसेच मनपा विभागाच्या अतिक्रमण विभागाने नियमित  रस्त्यावरील कारवाई करून रस्ता रिकामा ठेवावा. मनपाला अनेक पत्रव्यवहार करण्यात आले आहे ..

-राजकुमार बरडे, सह्याक पोलिस निरीक्षक, सिंहगड वाहतूक विभाग..

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com