Pune Laxmi Road: काय सांगता? लक्ष्मी रस्त्यावर चक्क ‘झोपडपट्टी’, प्रशासनाची भूमिका संशयास्पद! मोक्याच्या भूखंडावर कुणाचा डोळा?

Alleged Slum Declared on Laxmi Road: What's the Real Story : लक्ष्मी रस्त्यावरील वाड्यांना झोपडपट्टी दाखवून एसआरए योजनेचा गैरवापर; प्रशासन व बिल्डर संगनमतावर संशय, नागरिकांनी चौकशीची मागणी केली.
Controversial redevelopment site on Laxmi Road, where wadas have been allegedly declared slums to facilitate SRA projects.
Controversial redevelopment site on Laxmi Road, where wadas have been allegedly declared slums to facilitate SRA projects.esakal
Updated on

पुणे : पेठांमधील वाडे झोपडपट्टी दाखवून तेथे झोपडपट्टी पुनर्वसन योजना राबविली जात आहे. या प्रकरणाची चौकशी करण्यासाठी तत्कालीन आयुक्तांनी समिती नेमली होती. या समितीने झोपडपट्टी पुनर्वसन प्राधिकरणाकडून (एसआरए) माहिती मागितली होती, पण ती देण्यात आली नाही. त्यामुळे चौकशी अर्धवटच राहिली. महापालिकेची भूमिकाही संशयास्पद असून पार्किंगची जागा ‘एसआरए’ला दिली जात असताना त्यास थेट विरोध केला जात नाही. त्यामुळे लक्ष्मी रस्त्यावरील वाड्यांना झोपडपट्टी दाखवून त्यातून कोट्यवधी रुपयांचा नफा कमविण्याच्या उद्योगांना बळ मिळत आहे.

शहरातील वाडे झोपडपट्टीसदृश भाग असल्यास अभिप्राय घेऊन ‘एसआरए’ योजना राबविली जात आहे. हा प्रकार उघडकीस आल्यानंतर तत्कालीन आयुक्त विक्रम कुमार यांनी महापालिकेकडून तसा अभिप्राय देण्यावर बंदी घातली होती. तसेच यात कोट्यवधींचा भ्रष्टाचार झाल्याचा आरोप झाल्याने चौकशी समिती स्थापन केली होती. ही चौकशी समिती केवळ ‘एसआरए’कडून माहिती मिळविण्यासाठी प्रयत्न करत होती, पण ‘एसआरए’कडून महापालिकेला ही माहिती देण्यास टाळण्यात आले.

दीड वर्ष उलटून गेले तरी या समितीने अहवाल दिलेला नसल्याने सत्य समोर आले नाही. त्यामुळे हा सर्व प्रकार बिल्डर व वाडे झोपडपट्टी दाखविण्यासाठी खटाटोप करणाऱ्या माजी नगरसेवकांचा फायदा झाला आहे. या समितीचे सदस्य मुख्य अभियंता युवराज देशमुख यांनी ‘आम्हाला एसआरएकडून माहिती मिळाली नसल्याने अहवाल दिला नाही’ असे सांगितले. या संदर्भात ‘एसआरए’चे मुख्य कार्यकारी अधिकारी नीलेश गटणे यांना विचारले असता ‘‘वाड्यांना झोपडपट्टीसदृश वस्ती दाखविण्याचा अभिप्राय महापालिकेने दिला आहे. त्यामुळे त्यांच्याकडे माहिती असताना आमच्याकडे माहिती मागण्याचे कारण नाही,’’ असे सांगत ही मागणी फेटाळून लावली.

Controversial redevelopment site on Laxmi Road, where wadas have been allegedly declared slums to facilitate SRA projects.
Pune Ward Structure : पुण्यात १६५ नगरसेवक, ४२ प्रभाग; प्रभाग रचनेचे काम होणार सुरु

प्रशासनाची भूमिका संशयास्पद

- बुधवार पेठेत लक्ष्मी रस्त्याला लागून पाच वाड्यांना झोपडपट्टी दाखवून ‘एसआरए’ योजना राबविली जाणार आहे

- यासाठी ‘एसआरए’ने इरादा जाहीर केला आहे

- विक्रम कुमार यांनी स्थगिती दिलेली असताना नुकतेच सेवानिवृत्त झालेले आयुक्त डॉ. राजेंद्र भोसले यांनी या वाड्यांना ‘एसआरए’ दाखविण्यास मान्यता दिली आहे

- यामुळे पुन्हा एकदा मोक्याच्या भूखंडावर डोळा ठेवून तेथे ‘एसआरए’ राबविली जात आहे, असा आरोप माजी नगरसेवक उज्ज्वल केसकर, सुधीर कुलकर्णी, प्रशांत बधे यांनी केला आहे

- महापालिका आयुक्त नवलकिशोर राम यांच्याकडे तक्रार करून हे प्रकार रोखण्याची मागणी केली आहे.

पुणे महापालिका आयुक्तांनीच आम्हाला परवानगी दिली आहे. इतक्या वर्षांत या ठिकाणी पार्किंग झाले नाही. आता ‘एसआरए’ झाल्यानंतर पार्किंग उपलब्ध होईल. लक्ष्मी रस्त्यावर झोपडपट्टी आहे. सर्व भागांत इमारती नाहीत. तसेच वाड्यांच्या जागेवर कोणत्या आयुक्तांनी ‘एसआरए’साठी परवानगी दिली हे ते सांगू शकले नाहीत.

- नीलेश गटणे, मुख्य कार्यकारी अधिकारी, ‘एसआरए’

लक्ष्मी रस्त्यावर झोपडी दाखवाच : धंगेकर

लक्ष्मी रस्त्यावर झोपडपट्टी दाखवून महापालिकेच्या आरक्षणाच्या जागा माजी नगरसेवकाच्या मदतीने बिल्डरांच्या घशात घातल्या जात आहेत. हा प्रकार हाणून पाडला जाईल. लक्ष्मी रस्त्यावर मला झोपडी दाखवावी, अन्यथा त्यांच्याविरोधात आंदोलन केले जाईल, अशा इशारा ‘एसआरए’चे अधिकारी गटणे यांना दिला आहे, असे शिवसेनेचे महानगर प्रमुख, माजी आमदार रवींद्र धंगेकर यांनी सांगितले.

Controversial redevelopment site on Laxmi Road, where wadas have been allegedly declared slums to facilitate SRA projects.
Pune Traffic: गणेशोत्सवापूर्वी पुणेकरांना मोठा दिलासा! मंडई घेणार मोकळा श्वास! तीन वर्षांपासून लावलेले बॅरिकेड्स हटवणार

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com