'ई-सकाळ'ला बातमी आली अन् तासाभरातचं सूत्रे हलली...

विलास काटे
रविवार, 2 ऑगस्ट 2020

सकाळने आॅनलाइनला बातमी घेताच २ तासातच आळंदी येथील शौचालये चकाचक करण्यात आली आहेत.
 

आळंदी ः आळंदीसारख्या तिर्थक्षेत्राच्या ठिकाणी स्वच्छतागृहांची दुरावस्था आणि प्रशासनाचे दुर्लक्ष या सदराखाली ई-सकाळमध्ये बातमी प्रसिद्ध केली. त्यानंतर लगेचच पालिकेचा आरोग्य विभाग कामाला लागला. शहरातील शौचालयांच्या स्वच्छतेस सुरूवात झाली. शहरातील बहूतांश शौचालयांची स्वच्छता केल्याने नागरिकांनीही प्रशासनाचे व 'सकाळ'चे आभार मानले.

आणखी वाचा - कोरोना लसीसाठी आदर पुनावाला यांनी घेतली मोठी 'रिस्क'

शौचालयांना बाहेरून भिंती रंगविल्या. पण आत अस्वच्छतेमुळे पाय ठेवूशी वाटत नाही. याबाबत ई-सकाळला आज दुपारनंतर बातमी प्रसिद्ध झाली. सोशल मिडियावर बातमी व्हायरल झाल्याने आळंदी पालिका प्रशासन कामाला लागले आणि बघता बघता शहरातील सार्वजनिक शौचालये स्वच्छ झाली.

यामध्ये प्रामुख्याने भागिरथी नाला, गोपाळपुरा, सातारकर मठ या भागातील शौचालये आरोग्य विभागाकडून स्वच्छ झाली. मुख्याधिकारी अंकूश जाधव यांनी दाखविलेल्या तत्परतेबाबत कौतुक केले जात आहे. नव्यानेच नियुक्ती झालेल्या मुख्याधिकारी जाधव यांनी बातमीची दखल घेवून तत्काळ स्वच्छतेस सुरूवात केली. यामध्ये पालिकेच्या कार्यालयामागील शौचालय, चावडी चौपाल कार्यालयाचीही स्वच्छता आरोग्य विभागाच्या सफाई कर्मचार्यांकडून तत्काळ करून घेतली.

देशभरातील बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा

राज्य सरकारने दिलेल्या निधीतून शहरात विविध ठिकाणी शौचालये उभारली. मात्र स्वच्छतेसाठी कामगार नेमले मात्र स्वच्छता होत नव्हती.यापूर्वीच्या मुख्याधिका-यांकडे कितीतरी तक्रारी नागरिकांनी केल्या. मात्र दुर्लक्ष केले गेले. मात्र आज श्री.जाधव आणि सफाई कर्मचा-यांनी दाखवलेल्या तत्परतेचे माजी नगरसेवक डी.डी.भोसले आणि आळंदी विकास मंचच्या वतीने कौतुक केले. असेच स्वच्छतेत सातत्य ठेवले तर शहरातील नागरिकांचे आरोग्य नक्कीच सुधारले अशी नागरिकांनी भावना व्यक्त केल्या. 

 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: The toilets in Alandi were cleaned