मुंबई पुणे 'एक्सप्रेस वे'वरील भुयारी मार्गांची दुरवस्था; टोल वसुल करणाऱ्या कंपन्यांचे दुर्लक्ष

Toll collection company are ignoring the maintenance of the subway On the Mumbai-Pune Expressway
Toll collection company are ignoring the maintenance of the subway On the Mumbai-Pune Expressway
Updated on

बेबड ओहोळ : मुंबई पुणे द्रुतगती महामार्गावर अनेक ठिकाणी गावांमध्ये दळणवळणासाठी ठेवलेल्या भुयारी मार्गात (मोरी) पावसाच्या पाण्यामुळे गाळ व दगड आल्याने ये-जा करताना ग्रामस्थांना ञास सहन करावा लागत आहे. भुयारी मार्गात साचलेला राडारोडा टोल वसुल करणाऱ्या कंपनीने त्वरित काढुन टाकण्याची मागणी होत आहे.

कॅनॉलमध्ये वाहत चाललेल्या 'त्या' मायलेकींच्या मदतीला धावला देवदूत!​

मुंबई पुणे द्रुतगती महामार्ग तयार करून वीस वर्ष पुर्ण झाले आहे. या द्रुतगती महामार्गावर अनेक गावे असल्याने ठिकठिकाणी भुयारी मार्ग बांधण्यात आले. या भुयारी मार्गाचा वापर स्थानिक गावातील ग्रामस्थांनी जाण्यासाठी, जनावरे ने-आण करण्यासाठी व वाहतूक करण्याच्या उद्देशाने होता. तसेच ठिक-ठिकाणी असलेले नैसर्गिक ओढे यांच्यासाठीही होता, परंतु बहुतेक ठिकाणी याचा मार्ग बदल्याने ९० टक्के ग्रामस्थांनी या भुयारी मार्गाचा वापर बंद केला.  वापर बंद असल्याने या भुयारी मार्गात पावसाळ्यात हिरवे शेवाळ, छोटे मोठे दगड-गोटे पडुन असतात. त्यामुळे हा भुयारी मार्ग वाहतूकीसाठी उपयोगी नसल्याने फक्त जनावरांचीच डोंगरा भागात चरण्यासाठी ये-जा चालु असते. कारण, गेली वीस वर्षात या भुयारी मार्गात मुसळधार पावसामुळे डोंगरावरील दगड गोटे, गाळ वाहून आला आहे. त्यामुळे हा राडारोडा काढण्यासाठी गेली वीस वर्षात एकदाही टोल वसुल करणाऱ्या कंपन्यांचे लक्ष गेले नाही. सध्या या भुयारी मार्गातून पायपीट करताना ग्रामस्थांना घसरून पडण्याची तर दगड गोट्यामुळे दुखापत होण्याची तसेच सापांची भीती वाटते.

अजित पवारांवरील प्रेमापोटी बारामतीचा 'आयर्नमॅन' धावला नॉनस्टॉप १०० कि.मी.!​

भुयारी मार्गातील अडचणींमुळे अनेकजण द्रुतगती महामार्गावरून जीव धोक्यात घालून प्रवास करतात. त्यामुळे गेली वीस वर्ष लक्ष न दिलेल्या या भुयारी मार्गातील मोऱ्यातील राडारोड्याकडे टोल वसुल करणाऱ्या कंपनीने त्वरीत लक्ष देण्याची मागणी होत आहे. 

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप
- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे
 क्लिक करा

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com