अबब! टॉप तीनशे सहकारी संस्थांची उलाढाल तब्बल...

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 15 जानेवारी 2020

अय्यर म्हणाले, ''सहकार चळवळ ही सव्वाशे वर्षे जुनी असून, जगभरात एक अब्जांहून अधिक लोक सहकार संस्थांशी निगडीत आहेत. सहकार चळवळ केवळ कृषी आणि बॅंकिंग क्षेत्रापुरती मर्यादित राहिलेली नसून, विविध क्षेत्राचा सहकाराशी संबंध येतो. सहकार क्षेत्रातील कर्मचाऱ्यांमध्ये शिक्षण-प्रशिक्षणाचा अभाव आहे. त्यामुळे सहकार क्षेत्राला अधिक सक्षम होण्यासाठी कर्मचाऱ्यांना शिक्षण-प्रशिक्षणाची गरज आहे.

पुणे : जगातील टॉप तीनशे सहकारी संस्थांची वार्षिक उलाढाल ही 2.1 ट्रिलियन डॉलरवर पोचली असून, जागतिक अर्थव्यवस्थेत सहकार क्षेत्र सातव्या क्रमांकावर आहे. सहकार ही केवळ चळवळ न राहता मोठे व्यावसायिक क्षेत्र बनले असून, रोजगाराच्या संधी आहेत. त्यामुळे तरुणांनी सहकार क्षेत्राकडे वळावे, असे आवाहन एशिया आणि प्रशांत आंतरराष्ट्रीय सहकारी एलायन्सचे क्षेत्रीय निदेशक बालासुब्रमण्यम अय्यर यांनी केले.

lay.google.com/store/apps/details?id=com.sakal.esakal&hl=en" target="_blank">ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप 

वैकुंठ मेहता राष्ट्रीय सहकारी प्रबंधन संस्थेच्या (वॅम्निकॉम) स्थापना दिवसानिमित्त बुधवारी (ता.15) आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते. कृषी अर्थशास्त्रज्ञ डॉ. प्रकाश कम्मारडी, 'वॅम्निकॉम'चे डॉ. के. के. त्रिपाठी, डॉ. अनिल करंजकर आणि डॉ. गिरीश मांगलिक या वेळी उपस्थित होते.

पुणे : चोरटा गेला 'एमएसईबी'च्या पट्ट्या चोरायला अन् बसला शॉक 

अय्यर म्हणाले, ''सहकार चळवळ ही सव्वाशे वर्षे जुनी असून, जगभरात एक अब्जांहून अधिक लोक सहकार संस्थांशी निगडीत आहेत. सहकार चळवळ केवळ कृषी आणि बॅंकिंग क्षेत्रापुरती मर्यादित राहिलेली नसून, विविध क्षेत्राचा सहकाराशी संबंध येतो. सहकार क्षेत्रातील कर्मचाऱ्यांमध्ये शिक्षण-प्रशिक्षणाचा अभाव आहे. त्यामुळे सहकार क्षेत्राला अधिक सक्षम होण्यासाठी कर्मचाऱ्यांना शिक्षण-प्रशिक्षणाची गरज आहे. जपानमध्ये विविध विद्यापीठांमधील बहुतांश विद्यार्थी सहकारी ग्राहक भांडार, वैद्यकीय विमा, गृहनिर्माण अशा विविध सहकारी संस्थांशी जोडले गेले आहेत. तसेच, मलेशियात शाळांमध्येच सहकाराचे धडे गिरवले जात असून, 15 लाखांहून अधिक विद्यार्थी आणि शिक्षक सहकार क्षेत्राशी संबंधित आहेत.
माळशेजचा पतंग महोत्सव अडकला वादाच्या भोवऱ्यात कारण.... 

डॉ. कम्मारडी म्हणाले, शेतकरी अन्नधान्य, भाजीपाला मोठ्या प्रमाणावर पिकवतो. तरीही शेतकऱ्यांवर आत्महत्येची वेळ येत आहे, ही बाब खेदजनक आहे. शेतमालाला चांगला भाव आणि प्रक्रिया उद्योगांच्या वाढीसाठी एकत्रित प्रयत्न करण्याची गरज आहे.

पक्ष बदललाय... आता तुम्हीही बदला


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: The top three hundred cooperatives have a turnover of 2.1 trillion dollars