पुण्यात फिरत्या दवाखान्यांमुळे सापडले कोरोनाचे 'एवढे' रुग्ण...

A total of 34 corona patients were found in mobile clinics in Pune (2).jpg
A total of 34 corona patients were found in mobile clinics in Pune (2).jpg

पुणे : झोपडपट्टी व वस्ती भागात जाऊन रुग्णांची तपासणी करण्यासाठी भारतीय जैन संघटना (बीजेएस) व फोर्ज मोटर्सच्या ५० फिरत्या दवाखान्याच्या माध्यमातून शहरातील ८  हजार रुग्णांची तपासणी करण्यात आली. यामध्ये ३४ रुग्ण आढळले आहेत.
पुणे महापालिकेने फिरत्या दवाखान्यांची संख्या १०० पर्यंत वाढविण्याची मागणी केली आहे. 

कोरोनाच्या प्रकोपामुळे संपूर्ण भारतदेश लॉकडाऊनमध्ये आहे. पुण्याचा समावेश संवेदनशील शहरात आहे. त्यामुशे संपूर्ण शहर सील करण्यात आले आहे. नागरिकांना त्यांची वैदकीय तपासणी करण्यासाठी घराबाहेर पडता येत नाही. खोकला, सर्दी व ताप आला तरी कोरोना झाला आहे, असे भीतीचे वातावरण आहे.

पुण्याच्या इतर बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

रुग्णालय  गर्दी होऊ नये यासाठी 'बीजेएस' व फोर्स मोटर्स यांनी मोबाईल डीस्पेन्सरी व्हॅनद्वारे "डॉक्टर आपल्या दारी" हा उपक्रम १ एप्रिल पासून सुरु केला. पुणे व पिंपरी चिंचवडमध्ये ५० फिरत दवाखाने असून, त्यात सुमारे ३०० पेक्षा जास्त जण काम करत आहेत. यामुळे महापालिकेच्या यंत्रणेवरील ताण कमी झाला आहे. आत्तापर्यंत ८ हजार रुग्णांची तपासणी करण्यात आली आहे. त्यातील ३३६ जणांना रुग्णालय जाऊन तपासणी करण्यास सांगितले होते. त्यातून ३४ कोरोना पाॅजिटीव्ह रुग्ण सापडले आहेत. 

केवळ दुध विक्री केंद्र दोन तासासाठी राहणार सुरू

फिरत्या नागरिकांना त्यांच्या गल्लीपर्यंत वैद्यकीय सेवा उपलब्ध करून दिली जात आहे व त्यामुळे या उपक्रमाचा सर्वात जास्त फायदा रुग्णांना होत आहे. शिवाय कोरोनाचा प्रसार थांबण्यास मदत होत आहे. 

Coronavirus : उरुळी कांचन : कोरोनाग्रस्त महिला इतरांच्या संपर्कात अन्...

महापालिकेच्या अतिरिक्त आयुक्त रुबल अगरवाल यांनी यासंदर्भात भारतीय जैन संघटनेचे अध्यक्ष शांतीलाल मुथा यांना पत्र लिहिले असून, यामध्ये आणखी १०० फिरते दवाखाने सुरू करण्याची मागणी केली आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com