बारामतीच्या कोरोनाबाधित रुग्णसंख्यने गाठला साडेचारशेंच्या टप्पा

मिलिंद संगई
Thursday, 20 August 2020

18 ऑगस्ट रोजी आरटीपीसीआर तपासणीसाठी 89 नमुने घेतले होते. त्या पैकी 84 अहवाल प्राप्त झाले असून 81 जण निगेटीव्ह आहेत. पाच जणांचे अहवाल प्रतिक्षेत आहेत. शहरातील टीसी कॉलेजनजिक, उर्जाभवन व कसब्यातील असे एकूण तीन जण पॉझिटीव्ह आले.

बारामती : शहरातील कोरोनाग्रस्तांची संख्या वेगाने वाढू लागली असून आज बारामतीचा आकडा साडेचारशेंचा टप्पा पार करुन पुढे गेला. आज रुग्णांची संख्या 458 इतकी झाली आहे. तालुका आरोग्य अधिकारी डॉ. मनोज खोमणे यांनी या बाबत माहिती दिली. दरम्यान बरे झालेल्या रुग्णांची संख्या 219 असून दवाखान्यात उपचार घेणा-या रुग्णांची संख्या 215 इतकी आहे. कोरोनामुळे झालेल्या मृत्यूंचा आकडा आता 24 वर जाऊन पोहोचला आहे. 

'पीएमपी'साठी महापौर मोहोळ घेणार पुढाकार; बससेवा लवकर सुरू होण्याची शक्यता!

18 ऑगस्ट रोजी आरटीपीसीआर तपासणीसाठी 89 नमुने घेतले होते. त्या पैकी 84 अहवाल प्राप्त झाले असून 81 जण निगेटीव्ह आहेत. पाच जणांचे अहवाल प्रतिक्षेत आहेत. शहरातील टीसी कॉलेजनजिक, उर्जाभवन व कसब्यातील असे एकूण तीन जण पॉझिटीव्ह आले. 

19 ऑगस्ट रोजी आरटीपीसीआर साठी 135 जणांचे नमुने घेतले होते. त्या पैकी 26 जणांचे अहवाल निगेटीव्ह आले असून 109 जणांचे अहवाल प्रतिक्षेत आहेत. काल खाजगी प्रयोगशाळेत 63 जणांचे नमुन घेतेले गेले. त्यापैकी बारामती शहरातील 14 व ग्रामीण भागातील तीन असे एकूण 17 रुग्ण अँटीजेन पॉझिटिव्ह आढळले आहेत. 

- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

अँटीजेन पॉझिटिव्ह आलेल्या रुग्णांमध्ये शहरातील कसबा येथील एकाच कुटुंबातील पाच जणांचा समावेश आहे. या शिवाय माळेगाव रोड ,  निर्मिती हिल्स माळेगाव रोड, पान गल्ली, वणवे मळा , खंडोबा नगर, पाटस रोड, शिवाजीनगर भिगवण रोड, आमराई, जामदार रोड  असे 14 रुग्ण आहेत. तालुक्यातील  माळेगाव येथील पॉझिटिव्ह रुग्णाच्या संपर्कातील एक महिला तसेच कटफळ येथील पॉझिटिव्ह रुग्णाच्या संपर्कातील एक महिला व मूर्टी येथील एक वृद्ध असे तीन रुग्ण अँटीजेन पॉझिटिव्ह आले आहेत.

शहरातील गर्दी काही कमी होण्याचे नाव घेत नसल्याने रुग्णांची संख्याही वेगाने वाढते आहे. संपर्कातील रुग्ण वेगाने पॉझिटीव्ह येत आहेत. खाजगी प्रयोगशाळेतही तपासणी होऊ लागल्याने तपासणीचा आकडा जसा वाढू लागला आहे, तशी रुग्णांची संख्याही वेगाने वाढू लागली आहे. बारामतीची वाटचाल पाचशेच्या दिशेने सुरु झाली आहे. 

पुणेकरांच्या विरोधापुढे महापालिका झुकली; 'ते' बहुचर्चित टेंडर केलं रद्द!​

 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: The total Corona positive reached on the four and a half hundred in Baramati