Corona Updates : पुणे जिल्हा @६२०००; शहरात वाढ, तर ग्रामीणमध्ये घट!

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 24 जुलै 2020

गुरुवारी दिवसभरात मृत्यू पावलेल्या रुग्णांमध्ये पुणे शहरातील ३६, पिंपरी चिंचवडमधील १६ आणि ग्रामीण भागातील दोन, नगरपालिका आणि कॅंटोन्मेंट बोर्डातील मिळून चार जणांचा समावेश आहे. 

पुणे : पुणे, पिंपरी-चिंचवड शहर आणि ग्रामीण मिळून पुणे जिल्ह्यातील एकूण कोराना रुग्णांची संख्या आजपर्यंत ६२००२ झाली आहे.

यामध्ये गुरुवारी दिवसभरातील २ हजार ३६२ रुग्णांचा समावेश आहे. बुधवारच्या तुलनेत रुग्णांच्या संख्येत ८५० ने घट झाली आहे. दरम्यान, आज अखेरपर्यंत १ हजार ५६२ जणांना आपले प्राण गमवावे लागले आहेत. यामध्ये आज दिवसभरातील ५८ जणांचा समावेश आहे. 

'ऑफलाइन'वरुन 'ऑनलाईन' आलेल्यांना आहे जगभर डिमांड!

बुधवारी (ता.२२) रात्री नऊ वाजल्यापासून गुरुवारी (ता.२३) रात्री नऊ वाजेपर्यंतच्या २४ तासांत नोंदल्या गेलेल्या एकूण रुग्णांमध्ये पुणे शहरातील १ हजार ६६१, पिंपरी-चिंचवडमधील ३९९, जिल्हा परिषद कार्यक्षेत्रातील २१४ आणि नगरपालिका आणि कॅंटोन्मेंट बोर्डातील मिळून ९४ नव्या रुग्णांचा समावेश आहे. 

यामुळे गुरुवार अखेरपर्यंत पुणे जिल्ह्यातील एकूण रुग्णांची संख्या आता ६२ हजार ०२ झाली आहे. कालपर्यंत ही संख्या ५९ हजार ६३४ इतकी होती. गुरुवारी दिवसभरात मृत्यू पावलेल्या रुग्णांमध्ये पुणे शहरातील ३६, पिंपरी चिंचवडमधील १६ आणि ग्रामीण भागातील दोन, नगरपालिका आणि कॅंटोन्मेंट बोर्डातील मिळून चार जणांचा समावेश आहे. 

'त्या' रिक्त जागा भरण्याची प्रक्रिया दहा दिवसांत सुरू करा; सर्वोच्च न्यायालयानं सोडलं फर्मान​

शहरात वाढ, पिंपरी, ग्रामीणमध्ये घट 

दरम्यान, आज दिवसभरात नोंदल्या गेलेल्या नव्या रुग्णांच्या आकडेवारीनुसार पुणे शहरात गुरुवारी ३६ ने वाढ झाली आहे. याउलट पुणे ग्रामीण, पिंपरी चिंचवड, नगरपालिका आणि कॅंटोन्मेंट बोर्डातील रुग्णांच्या संख्येत घट झाली आहे. तसेच पिंपरी-चिंचवडमधील रुग्णांच्या संख्येत तब्बल ७९० ने घट झाली आहे.

- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा

(Edited by : Ashish N. Kadam)


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: total number of Corana patients in Pune district has reached 62002 till date