मुळशीत कोरोनाबाधितांचा आकडा पोहोचला पन्नाशीच्या उंबरठ्यावर!

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 29 जून 2020

कासार आंबोलीतील रुग्णांची संख्या आता तीन झाली आहे. यापूर्वी २३ जूनला सुतारवाडीत दोन रुग्ण सापडले आहेत.

पिरंगुट (पुणे) : मुळशी तालुक्यातील कोरोनाबाधित रुग्णांच्या संख्येने सोमवारी (ता.२९) पन्नाशीच्या उंबरठ्यावर पाऊल ठेवले. तालुक्यात कोरोनग्रस्तांची संख्या कमी होण्याची चिन्हे नाहीत. सोमवारी तालुक्यात दोन जण कोरोनाग्रस्त रुग्ण सापडल्याने एकूण रुग्णांची संख्या ४८ झाली आहे. कासार आंबोली (ता.मुळशी) येथील एकास तसेच नांदे येथील एका व्यक्तीला कोरोनची बाधा झाल्याचे निष्पन्न झाले आहे.  

- लग्नाच्या पॅकेजमध्ये आता 'ही' गोष्ट खातेय भाव; टॉवेल-टोपी नको, पण...

आज अखेर मुळशी तालुक्यात कोरोनाग्रस्तांची संख्या अठ्ठेचाळीस झाली असली तरी आणखी रुग्ण असण्याची शक्यता नाकारता येत नाही. कारण रुग्णाची माहिती तालुका स्तरावर समजेपर्यंत दोन दिवस उलटलेले असतात. कासार आंबोलीतील रुग्णांची संख्या आता तीन झाली आहे. यापूर्वी २३ जूनला सुतारवाडीत दोन रुग्ण सापडले आहेत. तालुक्यात कोरोनाची बाधा होण्याचे प्रमाण वाढतच चालले असल्याने नागरिकांनी स्वतःहून प्रतिबंधात्मक उपाययोजना करणे अतिशय गरजेचे झाले आहे.

- '... तर तुमची गय केली जाणार नाही'; दिलीप वळसे पाटील यांनी कुणाला दिला इशारा?

नांदे येथे आढळून आलेले रुग्ण हे माजी सरपंच असून ते गावातच राहत आहेत. गावातील अनेक कुटुंबे पिण्याचे पाणी आणायला रोज चांदे येथे जातात. त्यामुळे चांदे येथील पाणीपुरवठा तात्पुरता बंद करावा लागणार आहे. 

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Total number of patients has risen to 48 as two corona patients were found in Mulashi taluka on Monday