वेल्हेत पर्यटनासाठी जात असाल, तर ही बातमी वाचाच

मनोज कुंभार
Sunday, 21 June 2020

वेल्हे तालुक्यातील निसर्गरम्य परिसर पर्यटकांना खुणावत असला, तरी भोरचे आपत्ती कक्षाचे इंन्सीडंड कमांडर तथा प्रांताधिकारी अधिकारी राजेंद्रकुमार जाधव यांनी १८ जून रोजी पर्यटनास बंदी असल्याचे आदेश जारी केले.

वेल्हे (पुणे) : वेल्हे तालुक्यातील निसर्गरम्य परिसर पर्यटकांना खुणावत असला, तरी भोरचे आपत्ती कक्षाचे इंन्सीडंड कमांडर तथा प्रांताधिकारी अधिकारी राजेंद्रकुमार जाधव यांनी १८ जून रोजी पर्यटनास बंदी असल्याचे आदेश जारी केले. त्यामुळे वेल्हेत पर्यटनासाठी येताय, तर दंड भरूनच 
परत जा, अशी गत पर्यटकांची झाली आहे. आज पंधरा हजारावर दंड वसूल झाल्याची माहिती वेल्हे पोलिसांनी दिली.

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप   

वेल्हे तालुक्यामध्ये तोरणा व राजगड किल्ले आहेत, तर नरवीर तानाजी मालुसरे घाट (जुने नाव मढे घाट) गुंजवणी, पानशेत व वरसगाव अशी तीन धरणे असून अनेक छोटे-मोठे धबधबे, धार्मिक स्थळे असल्याने आहेत. त्यामुळे या भागात पावसाळ्यामध्ये पर्यटनासाठी व वर्षाविहारासाठी हजारो पर्यटक वेल्हे तालुक्यात येतात. पावसाळ्यामध्ये या ठिकाणी  अनेक छोटे-मोठे अपघात होता. तर तरुणांकडून मद्यपान व हुल्लडबाजी होत असते. परिणामी गुन्ह्यांच्या प्रमाणात वाढ होते. 

- पुणे कृषी उत्पन्न बाजार समितीवर यापुढे राहणार हवेलीकरांचे वर्चस्व; वाचा सविस्तर बातमी

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर प्रातांधिकारी जाधव यांनी पर्यटन बंदीचा आदेश काढला आहे. आज रविवारी वेल्हे तालुक्यामध्ये अनेक पर्यटकांनी धाव घेतली होती, तरी या पर्यटकांना तालुक्यात प्रवेश केल्यानंतर करंजावणे (ता. वेल्हे) येथील चेक नाक्यावर रोखण्यात येत होते. प्रत्येक वाहनाची कसून चौकशी केली जात होती. यामध्ये आलेल्या पर्यटकांच्या वाहनांची कागदपत्रे नाही, चालकाचे लायसन्स नाही, चारचाकीच्या गॉगल काचा, ट्रिपल सीट अशा कारणांवरून ई-चलन मशिनद्वारे दंड आकारण्यात आला. 

- काय सांगता? एका महिलेमुळं इंदापूरातील सहा गावे बफर झोनमध्ये!

वाहनावरील असलेला जुना दंड भरून घेतला जात होता. यामध्ये रविवारी 
दिवसभरात पंधरा हजारांच्यावर दंड वसूल केला. अनेक वाहनांवर दंडात्मक कारवाई केली गेली. सहाय्यक पोलिस निरीक्षक विनायक देवकर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस कॉन्स्टेबल शिवाजी बाबर, कांतिलाल कोळपे, होमगार्ड शुभम कदम, विलास गायकवाड, विलास गायकवाड यांनी चोख बंदोबस्त ठेवला. यामुळे वेल्ह्यात पर्यटनास या व दंड भरुनच परत जा, अशी गत अनेक पर्यटकांची झाली होती.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: tourists fined by police for visiting velhe pune