esakal | पुणे कृषी उत्पन्न बाजार समितीवर यापुढे राहणार हवेलीकरांचे वर्चस्व; वाचा सविस्तर बातमी
sakal

बोलून बातमी शोधा

Pune-Market-Yard

या निर्णयामुळे हवेलीकरांनतर तब्बल पंधऱा वर्षानंतर "हवेली कृषी उत्पन्न बाजार समिती" मिळण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. ​

पुणे कृषी उत्पन्न बाजार समितीवर यापुढे राहणार हवेलीकरांचे वर्चस्व; वाचा सविस्तर बातमी

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

लोणी काळभोर (पुणे) : हवेली तालुक्याची शान असलेली गुलटेकडी (पुणे) येथील कृषी उत्पन्न बाजार समिती यापुढील काळात फक्त हवेली तालुक्याचीच असणार आहे. यापुढील काळात हवेली आणि मुळशी तालुक्यासाठी पूर्वीप्रमाणे स्वतंत्र कृषी उत्पन्न बाजार समित्या अस्तित्वात येणार आहेत. येत्या काही दिवसात हवेलीसाठी "हवेली कृषी उत्पन्न बाजार समिती" या नावाने बाजार समिती अस्तित्वात येणार असल्याची माहिती आमदार अशोक पवार यांनी दिली. 

- बारामतीकरांसाठी दिलासादायक बातमी; आता संध्याकाळी सातपर्यंत...

उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या सुचनेनुसार सहकारमंत्री बाळासाहेब पाटील यांनी नुकतीच वरील बदलास मान्यता दिली आहे. त्यानुसार पुणे विभागीय कृषी उत्पन्न बाजार समितीचे विभाजन करुन, पूर्वीप्रमाणेच हवेली आणि मुळशी कृषी उत्पन्न बाजार समित्यांचे स्वतंत्र अस्तित्व कायम राहणार आहे. दरम्यान या निर्णयामुळे हवेलीकरांनतर तब्बल पंधऱा वर्षानंतर "हवेली कृषी उत्पन्न बाजार समिती" मिळण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. 

- उपअधीक्षक झालेला प्रविण सांगतोय 'एमपीएससी'चा 'सक्सेस मंत्र'!

देवेंद्र फडणवीस यांच्या मुख्यमंत्री पदाच्या काळात हवेली आणि मुळशी बाजार समितीचे एकत्रीकरण करुन, दोन वर्षापूर्वी पुणे विभागीय कृषी उत्पन्न बाजार समिती स्थापन करण्यात आली होती. मात्र, उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली नवीन सरकार स्थापन होताच, आमदार अशोक पवार आणि संग्राम थोपटे यांनी 
पुणे विभागीय कृषी उत्पन्न बाजार समितीचे विभाजन करुन, पूर्वीप्रमाणेच हवेली आणि मुळशी कृषी उत्पन्न बाजार समित्यांचे स्वतंत्र अस्तित्व कायम ठेवावे अशी मागणी केली होती. याबाबत तीन महिण्यापूर्वी सहकारमंत्री बाळासाहेब पाटील यांच्या समवेत मंत्रालयात बैठकही झाली होती. या बैठकीतच बाळासाहेब पाटील यांनी वरील बदलाचे संकेत दिले होते. 

- बनावट प्रवासी पास तयार करून त्याची विक्री करायचा फोटोग्राफर; मग...

याबाबत अधिक माहिती देतांना आमदार अशोक पवार म्हणाले, राज्यात प्रत्येक तालुक्यासाठी स्वतंत्र बाजार समिती असताना, राज्य शासनाने अडीच वर्षापूर्वी हवेली आणि मुळशी या तालुक्यावर अन्याय करुन, दोन्ही तालुक्यांच्या दोन वेगवेगळ्या बाजार समिती एकत्रित केल्या होत्या. तसेच मागील पंधरा वर्षापासून या बाजार समितीवर शासन नियुक्त प्रशासक नेमला जात होता. हा अन्याय दूर करण्यासाठी मंत्रालयात तीन महिन्यांपूर्वी आमदार संग्राम थोपटे यांच्या समवेत सहकारमंत्री बाळासाहेब पाटील यांची भेट घेऊन, पुणे विभागीय कृषी उत्पन्न बाजार समितीचे विभाजन करुन, पूर्वीप्रमाणेच हवेली आणि मुळशी कृषी उत्पन्न बाजार समित्यांचे स्वतंत्र अस्तित्व कायम ठेवण्याची विनंती केली होती. तसेच चार दिवसांपूर्वी याबाबत उपमुख्यमंत्री अजित पवार यांची भेट घेऊन, पवार यांच्याकडेही वरील मागणीबाबत चर्चा केली होती. याबाबत उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी लक्ष घातल्याने वरील बदल होणार आहे. 

- परिस्थितीशी दोन हात करत पुण्यातील मोनिका बनली उपशिक्षण अधिकारी

हवेली कृषी उत्पन्न बाजार समितीचे कायक्षेत्र
दरम्यान हवेली आणि मुळशी या दोन बाजार समित्या स्वतंत्र झाल्यानंतर, हवेली कृषी उत्पन्न बाजार समितीत पुणे शहर, पिंपरी चिंचवड महापालिका हद्दीतील परिसर, पुणे, खडकी, देहुरोड कॅन्टोन्मेंट आणि हवेली तालुक्‍यातील सर्व गावांचा समावेश असणार आहे. तर या निर्णयामुळे आशिया खंडात सर्वात मोठी बाजार समिती असा नावलौकीक असणाऱ्या हवेली कृषी उत्पन्न बाजार समितीची सत्तासूत्रे तब्बल सोळा वर्षानंतर हवेलीकरांच्या हाती येण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे  क्लिक करा