esakal | दुचाकीवर सहाजणांना पाहून पोलीसही चक्रावले
sakal

बोलून बातमी शोधा

हद्दच झाली राव! दुचाकीवर सहाजणांना पाहून पोलीसही चक्रावले

हद्दच झाली राव! दुचाकीवर सहाजणांना पाहून पोलीसही चक्रावले

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

महाराष्ट्र वगळता इतर राज्यांमध्ये दुचाकीवर किती जणांनी प्रवास करावा याला बंधन नसल्याचे वारंवार सोशल मीडियावरील चित्रात स्पष्ट झाले आहे. मात्र बुधवारी सोलापूर रस्त्यावर दुचाकीवर सहाजण आणि त्यातील चौघे विनामास्क होते. कोरोना महामारीचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी शासनाने कडक निर्बंध जारी केले आहेत, त्याची पोलीस यंत्रणेकडून बॅरिगेट लावून अंमलबजावणी केली जात आहे. एवढा बंदोबस्त असूनही हे महाशय दुचाकीचालक त्याची पत्नी, दोन मुले टाकीवर, एक दोघांच्या मधे, तर एक त्या महिलेच्या काखेतील झोळीमध्ये असा सहाजणांचा प्रवास पाहून पोलीसही चक्रारवलेले पाहायला मिळाले.

सोलापूर रस्त्यावर रेसकोर्स पोलीस चौकीजवळ पोलिसांनी हात केल्यानंतर दुचाकीचालकाने वाहन थांबवले. हे पाहताच समजदार चिमुकल्याने शर्ट ओढून तोंड झाकण्याचा प्रयत्न केला. निरागस चिमुकले आणि केविलवाना महिलेचा चेहरा पाहून पोलिसांच्या हृदयाला पाझर फुटला नाही, तर नवल ते कसले. तुम्ही स्वतःच्या आणि कुटुंबीयांच्या सुरक्षेसाठी मास्क वापरा. धोकादायक पद्धतीने प्रवास करू नका, आम्हाला कारवाई करण्यात समाधान वाटत नाही. मात्र, तुमच्या अशा बेफिकीरीपणामुळे कारवाई करावी लागते. तुमच्या चुकीची शिक्षा लहानग्यांना देऊ नका, असाही सबुरीचा सल्ला त्यांनी त्या दुचाकीचालकाला दिला.

हेही वाचा: वाढदिवशीच माजी आमदार मधुकर ठाकूर यांचे निधन

मागील काही दिवसांपासून कोरोना महामारीचा ज्वर कमी झाल्यामुळे कडक निर्बंध शिथील केले आहेत. त्यामुळे व्यवसाय-उद्योग आणि कंपन्या सुरू झाल्या आहेत. त्यामुळे कामगारवर्ग आता दुचाकीवर कामाच्या ठिकाणी ये-जा करीत आहेत. ग्रामीण भागातील मंडळीही खरेदी-विक्रीसाठी आता शहरामध्ये येऊ लागली आहेत. त्यामुळे रस्त्यावर वाहनांची वर्दळ वाढली आहे.

हेही वाचा: इंग्लंडचा मालिकेवर कब्जा, स्फोटक फलंदाजीनं स्मृतीनं मनं जिंकली

हेही वाचा: राज्यात लवकरच महाभरती; MPSC अंतर्गत 15 हजार जागा भरणार

हेही वाचा: दिलासा नाहीच; राज्यातील कोरोना निर्बंध तुर्तास कायम

loading image