esakal | व्यापार युद्ध व कोरोना आपल्यासाठी संधी - विजय गोखले

बोलून बातमी शोधा

मयूर कॉलनी - परिसंवादात बोलताना विजय गोखले आणि इतर मान्यवर.

चीनकडून देशात होणारी आयात कमी झाली असून आपली निर्यात मात्र वाढली आहे. चीनने स्थानिक पातळीवर बाजारपेठा उपलब्ध करण्यावर व सेवा वाढविण्यावर भर दिला आहे. देशातील मोठ्या कंपन्या वगळता आपली निर्यात कमी आहे. 
- डॉ. अजित रानडे, अर्थतज्ज्ञ

व्यापार युद्ध व कोरोना आपल्यासाठी संधी - विजय गोखले
sakal_logo
By
सकाळवृत्तसेवा

पुणे - ‘आर्थिकदृष्ट्या आपण चीनवर अवलंबून असू तर त्यांना आव्हान देऊ शकत नाही, त्यामुळे जर आपल्याला जगात ठसा उमटवायचा असेल, तर ‘मेक इन इंडिया’ यशस्वी झाले पाहिजे. चीन-अमेरिकेतील व्यापार युद्ध आणि कोरोना व्हायरस हे आपल्यासाठी एक संधी आहे,’’ असे मत माजी परराष्ट्र सचिव विजय गोखले यांनी मंगळवारी व्यक्त केले. 

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप 

‘एकविसाव्या शतकातील भारत-चीन संबंध - आव्हाने आणि संधी’ या विषयावरील परिसंवादात गोखले बोलत होते. ‘सेंटर फॉर ॲडव्हान्स्ड स्ट्रॅटेजिक स्टडीज’ (सीएएसएस) आणि ‘महाराष्ट्र एज्युकेशन सोसायटी’ (एमईएस) यांच्यातर्फे या परिसंवादाचे आयोजन करण्यात आले होते. ‘एमईएस’चे अध्यक्ष एअर मार्शल भूषण गोखले (निवृत्त) या वेळी उपस्थित होते. 

धक्कादायक:पुणे-मुंबई प्रवासात उबर ड्रायव्हर झोपला; महिलेनेच चालवली कॅब

विजय गोखले म्हणाले, ‘‘चीनमधील सद्यस्थितीचा फायदा घेऊन आपले उद्योग चीनच्या पुढे जाऊ शकतात. त्यासाठी आपल्या धोरणांमध्ये बदल करावे लागतील. कोरोनाचा चीनच्या अर्थव्यवस्थेवर परिणाम झाला आहे. मात्र अशी परिस्थिती हाताळण्याबाबत तेथील राजकीय शक्तीला आपण दुर्लक्षित करता कामा नये. चीनचे सरकार आता नागरी समस्यांसह पर्यावरण, आरोग्य, शिक्षण, तंत्रज्ञान आदी बाबींवर वर भर देत आहे. त्याचे चांगले परिमाण समोर येत असून ते ई-वाहणे, पुनर्निर्माण होऊ शकणारी ऊर्जा आदी बाबींत आघाडीवर आहे.’’ 

'तू मला खूप आवडते'' म्हणत तरुणीशी केले अश्‍लील वर्तन

चीनबाबतच्या व्यापार योजनांबाबत गोखले म्हणाले, ‘‘चीनशी व्यवहार करताना दीर्घकालीन व सुरक्षित योजना आखणे गरजेचे आहे. आपण अमेरिकेबरोबरचे संबंध वाढवायला तर रशियाबरोबरीचे संबंध सुधारले पाहिजे. कारण रशिया आपल्याला विश्‍वासूपणे सैनिकी हत्यारे पुरवीत आहे.’’ तैवान ॲलुमिना असोसिएशनच्या अध्यक्षा नम्रता हसीजा, लेफ्टनंट जनरल प्रवीण बक्षी (निवृत्त), कमांडर अर्नब दास (निवृत्त), परराष्ट्र सेवेतील निवृत्त अधिकारी गौतम बंबावले, एम. के. मंगलमूर्ती, सुधीर देवरे, मेजर जनरल एस. एच. महाजन (निवृत्त) आणि प्रियांका पंडित यांनीदेखील आपले विचार मांडले.