पुरंदरला फळे आणि भाजीपालाचे निर्यात केंद्र उभारावे; व्यापाऱ्यांनी शरद पवारांकडे केली मागणी

Sharad_Pawar
Sharad_Pawar

सासवड (पुणे) : पुरंदर तालुक्यातील अनेक फळे आणि भाजीपाला उत्पादक शेतकरी सासवड शहरातील वाघडोंगर पायथ्यालगतच्या स्थलांतरीत घाऊक बाजारात येतात, पण तिथे अपेक्षित सुविधा नाही. खरे तर आज मुंबई आणि शहरी भागासह परराज्यातील व्यापारी पुरंदर तालुक्यातील अव्दितीय चवीच्या शेतीमालाकडे आकर्षिक झाले आहेत. त्यामुळे विस्तारणाऱ्या या बाजारास सासवड किंवा परिसरात काही अंतरावर अद्यावत फळे आणि भाजीपाला बाजार तसेच निर्यात केंद्र शासनामार्फत सुरू करावे, अशी मागणी शेतीमाल व्यापारातील जुने आडतदार सतिश उरसळ आणि युवा शेतीमाल अभ्यासक रोहण उरसळ यांनी खासदार शरद पवार यांच्याकडे केली आहे. 

पुरंदर येथील सतिश उरसळ आणि आडतदार रोहण उरसळ यांनी पुरंदरच्या बाजार सुविधा विषयावर पवार यांची भेट घेऊन चर्चा केली. तसेच विशेषतः मुद्देवार पत्रही दिले. यावेळी काही प्रश्न विचारत आणि माहिती घेत पवार यांनी सकारात्मक प्रतिसादही दिला. पुरंदर तालुक्यातील अंजीर आणि सीताफळास अद्वितीय गोडी आहे. अलीकडे डाळींब, पेरुचे क्षेत्रही वाढले. तसेच हिरवा वाटाणा आणि अस्सल चवीच्या भाज्या येथे तयार होतात. त्यातून आगळ्या चवीमुळे देशभरात येथील शेतीमालास मागणी आहे, व्यापारीही येतात. मात्र अपेक्षित सुविधा नाहीत. केंद्र वा राज्य सरकारच्या मार्फत या सुविधा आणि आवश्यक त्या परवानगीसह निर्माण केल्या, तर तालुका पातळीवरील पुरंदरचे हे नियोजित अद्यावत फळे व भाजीपाला बाजार आणि निर्यात केंद्र राज्यात क्रमांक एकचे ठरेल. एवढी येथे आताच शेतीमालाची आणि व्यापाऱ्यांचीही व्याप्ती आहे. सुविधेनंतर तर याचा विस्तार आणखी वाढेल. 

वरिष्ठांसह बैठक घेण्याचे पवारांचे सुतोवाच..

भविष्यात ज्येष्ठ नेते शरद पवार यांच्या मार्गदर्शनाखाली पुरंदरमध्ये होणारे छत्रपती संभाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळ तर कायापालट करणारे ठरणार आहे. त्यामुळे केंद्राच्या अपेडाच्या साह्याने आणि राज्याच्या पणन विभागाच्या वतीने नियोजित 'अद्ययावत फळे व भाजीपाला बाजार आणि निर्यात केंद्र' झाले, तर शेतीमालाची जागतिक निर्यात येथूनच वाढणार हे स्पष्ट आहे. या मुद्यावरही पवार यांच्याशी चर्चा झाल्याचे उरसळ यांनी सांगितले. साऱ्याच मुद्द्यांवर पवार यांनी सकारात्मक प्रतिसाद देत लवकरच संबंधित विभागाच्या वरिष्ठांसह बैठक घेण्याचे सुतोवाचही पवार यांनी केले.  

राष्ट्रीय बाजाराला बळ अन् कृषी व प्रक्रिया उत्पादनांत वाढ 

दिवे (ता. पुरंदर) येथे मागील सरकारच्या आणि विजय शिवतारे यांच्या शिफारसीने 'राष्ट्रीय बाजार' होण्याबाबत बराच प्रश्न पुढे सरकला आहे. त्यालाही येथील नियोजित विमानतळ आणि अद्ययावत फळे व भाजीपाला बाजार आणि निर्यात केंद्राने बळ मिळेल. पणनमार्फत येथे आतापासूनच बाजार सुविधा वाढल्यास पुरंदरचीच नव्हे, तर परिसरातील तालुक्यांचीही कृषी उत्पादने आणि कृषी प्रक्रिया उत्पादनांतून शेतकऱ्यांचे दरडोई उत्पन्न वाढेल. 

- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा

(Edited by : Ashish N. Kadam)

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com