esakal | गर्दी झाल्यास बाजीराव आणि शिवाजी रस्त्यावरील वाहतूक बंद करण्यात येणार
sakal

बोलून बातमी शोधा

Traffic planning

गर्दी झाल्यास बाजीराव आणि शिवाजी रस्त्यावरील वाहतूक बंद करण्यात येणार

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

पुणे : गणेश मूर्ती तसेच पूजा साहित्य खरेदीसाठी गुरुवारी (ता. 9) शहराच्या मध्यभागात होणारी गर्दी विचारात घेऊन बाजीराव रस्ता तसेच शिवाजी रस्त्यावरील वाहतूक व्यवस्थेत बदल करण्यात येणार आहेत. तसेच गणेशोत्सवानिमित्त गर्दी वाढल्यास शिवाजी आणि बाजीराव रस्ता वाहतुकीस बंद करण्यात येणार आहे. हे बदल १९ सप्टेंबरपर्यंत कायम राहणार आहेत. 

हेही वाचा: Pune : राष्ट्रवादी कॉंग्रेसची जंबो शहर कार्यकारिणी जाहीर

शिवाजी रस्त्यावरून स्वारगेटकडे जाणा-या वाहनचालकांनी स. गो. बर्वे चौकातून (मॉडर्न कॅफे चौक) जंगली महाराज रस्ता, खंडोजीबाबा चौक, टिळक रस्तामार्गे स्वारगेटकडे जावे. पूरम चौकातून बाजीराव रस्त्याकडे जाणा-या वाहनचालकांनी पूरम चौक टिळक रस्तामार्गे अलका टॉकीज चौक, संभाजी पूलमार्गे इच्छित स्थळी जावे. शनिपार चौक ते मंडई दरम्यानचा रस्ता आवश्यकता भासल्यास बंद करण्यात येईल, तसेच अप्पा बळवंत चौकातून बुधवार चौकाकडे जाणारा रस्तादेखील बंद ठेवण्यात येईल. 

हेही वाचा: आंबेगाव: वृक्षारोपण करून 'हरीत'श्रद्धांजली

वाहनचालकांनी पोलिसांनी दिलेल्या सूचनांचे पालन करून सहकार्य करावे, असे आवाहन वाहतूक शाखेचे पोलिस उपायुक्त राहुल श्रीरामे यांनी केले आहे.

loading image
go to top