Mumbai Pune Expressway traffic jam : मुंबई–पुणे द्रुतगती मार्गावर पुन्हा वाहतूक कोंडी; खंडाळा बोगद्याजवळ वाहनांच्या लांबच लांब रांगा

Mumbai Pune road conditions : मुंबई–पुणे द्रुतगती मार्गावर पुन्हा एकदा वाहतूक कोंडी निर्माण झाली असून खंडाळा बोगद्याजवळ वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या आहेत. जाणून घ्या ताज्या घडामोडी.
Mumbai Pune Expressway traffic jam

Traffic Snarl on Mumbai–Pune Expressway

esakal

Updated on

Mumbai Pune highway congestion : मुंबई–पुणे द्रुतगती मार्गावर पुन्हा एकदा वाहतूक कोंडी झाल्याने प्रवाशांना मोठ्या गैरसोयीचा सामना करावा लागत आहे. खंडाळा बोगद्याआधी तसेच बोगद्याजवळ दोन्ही बाजूंनी वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या आहेत. पुण्याहून मुंबईकडे जाणाऱ्या मार्गावर बोगद्याजवळ वाहने संथ गतीने पुढे सरकत असून काही ठिकाणी वाहतूक पूर्णपणे ठप्प झाल्याचे चित्र आहे. त्याचप्रमाणे मुंबईहून पुण्याकडे येणाऱ्या मार्गावरही मोठ्या प्रमाणात कोंडी झाली आहे. त्यामुळे दोन्ही दिशांनी प्रवाशांना विलंब सहन करावा लागत आहे.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com