Pune : पार्किंग शुल्क आकारणीस अडते, कामगार संघटनांचा विरोध | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Pune : पार्किंग शुल्क आकारणीस अडते, कामगार संघटनांचा विरोध

Pune : पार्किंग शुल्क आकारणीस अडते, कामगार संघटनांचा विरोध

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

मार्केट यार्ड : पुणे बाजार समितीने फळे, भाजीपाला बाजाराच्या खरेदीदार, व्यापाऱ्यांच्या वाहनांकडून पार्किंग शुल्क आकारणीस सुरुवात केली आहे. तर बाजारातील उलाढालीवर मोठा परिणाम होण्याची शक्यता व्यक्त करत अडते असोसिएशन आणि कामगार संघटनांनी या निर्णयाला विरोध दर्शविला आहे. हा निर्णय थांबवण्याची मागणी त्यांनी केली असून आंदोलन करण्याचा इशारा दिला आहे.

हेही वाचा: भाजपने पैसे वाटले, दंगलीचं रचलं सुनियोजित षडयंत्र - नवाब मलिक

बुधवारपासून (ता.१०) बाजार समितीने पार्किंग शुल्क आकारणीचे काम सुरू केले आहे. या निर्णयाला बाजारातील विविध संघटनांनी विरोध केला आहे. याबाबत संघटनांनी बाजार समितीला पत्राद्वारेही कळविले आहे. कोरोनाच्या परिस्थितीमुळे आधीच बाजार पूर्णपणे विस्कळीत झालेला आहे. त्यातच राज्य शासनाने जाहीर केलेल्या बाजार आवारा बाहेरील नियमन मुक्तीमुळे बाजारामध्ये होणाऱ्या शेतमालाच्या आवकी वर फार मोठा परिणाम झालेला आहे. त्याचप्रमाणे सातत्याने होणाऱ्या इंधन दरवाढीमुळे टेम्पो व्यवसायिक व स्वतःचे टेम्पो घेऊन येणाऱ्या खरेदीदार व्यापाऱ्यांच्या व्यापारावर फार मोठ्या प्रमाणात परिणाम झालेला झालेला असल्याने आपण हा निर्णय त्वरित मागे घ्यावा असे श्री छत्रपती शिवाजी मार्केट यार्ड असोसिएशने दिलेल्या पत्रात म्हटले आहे.

बाजारामधे माल खरेदी करणेसाठी येणारे व्यापारी व खरेदीदार हे आपण सुरु केलेल्या वाहनतळ शुल्क आकारणीमुळे आलेले नाही. त्यामुळे साहजिकच माल पडुन राहिलेला असल्यामुळे शेतकऱ्यांच्या मालाचे दर देखील कोसळलेले आहेत. त्याच्या परिणामार्थ शेतकरी, आडते व कामगारांचे देखील नुकसान होत आहे. अशीच परिस्थिती बाजारामधे राहिल्यास बाजारामधे सुरु असलेली व्यवस्था संपुर्णपणे कोलमडली जाईल व त्यामुळे शेतकरी, खरेदीदार व टेंम्पो चालक हे नवीन पर्याय शोधुन बाजार आवाराच्या बाहेर जावु शकतात. त्यामुळे सर्व घटकांचे नुकसान होणार आहे. फळे-भाजीपाला विभागामधे सुरु केलेले वाहनतळ शुल्क तात्काळ थांबविण्यात यावे. अन्यथा सर्व संघटनाच्या वतीने आंदोलन करण्याचा इशारा पत्राद्वारे कामगार युनियनने दिला आहे.

हेही वाचा: चित्रा वाघ यांना भाजपकडून विधानपरिषदेसाठी उमेदवारी?

"बाजारामध्ये येत असताना इंधन दरवाढ , जागोजागी आकारण्यात येणारे टोल, त्याच प्रमाणे वाहतूक पोलिसांकडून केली जाणारी कारवाई या सर्व अडचणींना तोंड देत टेम्पोचालक बाजारामध्ये सातत्याने येत असतात . बाजारामध्ये होणाऱ्या उलाढाली मध्ये सदर टेम्पो चालकांचे सातत्याने मोठे योगदान असते. त्यामुळे टेम्पो चालकांकडून कोणतेही शुल्क आकारू नये."

- विलास भुजबळ, अध्यक्ष, अडते असोसिएशन.

"फळे भाजीपाला विभागात शेतीमाल खरेदीदार टेम्पो साठी पार्किंग सुविधा सुरू करण्यात आलेली आहे. पार्किंग शुल्क मापक असून बाजार आवारात वाहनांना एक शिस्त असावी या उद्देशाने ही सुविधा सुरू करण्यात आलेली आहे. या सुविधेमुळे बाजार आवारातील वाहतूक सुरळीत होण्यास मदत झालेली आहे. या सुविधेचे खरेदीदार टेम्पो चालक यांनी स्वागत केले आहे. त्यांनी बाजार समिती ने केलेल्या या वाहतूक व्यवस्थेबद्दल समाधान व्यक्त केले आहे . पावती शिवाय कोणालाही पार्किंग शुल्क खरेदीदार टेम्पो धारकांनी देऊ नये असे आवाहन बाजार समितीच्या वतीने करण्यात येत आहे."

- मधुकांत गरड, प्रशासक, कृषी उत्पन्न बाजार समिती, पुणे

"आधी शंभर रुपये घेऊन गाडी लावून दिली जात होती. मुक्ता पार्किंगचे शंभर रुपये आणि भरायचे तीनशे रुपये त्यामुळे मला परवडत नाही."

- सुरेखा लावडे, खरेदीदार

"वाराई आता डागाप्रमाणे सुरू केली आहे. संपूर्ण वाराई 480 रुपये झाली. मी आधी त्यांना वाराई 220 रुपये देत होतो. तसेच बाजार समितीने शंभर रुपये पार्किंग शुल्क आकारले आहे. त्यामुळे हे मला परवडत नाही. वारणार आधी माल व्यवस्थित लावत होते. तसेच मालक चोरी जाण्याची जबाबदारी ही ते घेत होते. त्यांच्या सोयीनुसार ते गाडी पार्किंग हि करत होते. परंतु आज मला गाडी लावण्यास खूप त्रास झाला."

- सागर चोपडे, पीकअप, वाहन चालक, लोणावळा

loading image
go to top