Police Officer Transfer : वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांच्या बदल्या आणि नागरिकांची नाराजी

येत्या लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पिंपरी- चिंचवड पोलीस आयुक्तालयातील अकरा वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांच्या नुकत्याच बदल्या झाल्या आहेत.
Police officer Transfer
Police officer Transferesakal

चाकण - येत्या लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पिंपरी- चिंचवड पोलीस आयुक्तालयातील अकरा वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांच्या नुकत्याच बदल्या झाल्या आहेत. चाकण पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक अशोक कदम, महाळुंगे पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक वसंत बाबर यांची बदली करण्यात आलेली आहे.

पाच महिन्यापूर्वी वरिष्ठ पोलीस निरीक्षक कदम हे चाकण पोलीस ठाण्यात रुजू झालेले आहेत तर दहा महिन्यापूर्वी महाळुंगे पोलीस ठाण्यात वरिष्ठ पोलीस निरीक्षक वसंत बाबर रुजू झालेले आहेत. परंतु अधिकाऱ्यांचा कार्यकाळ पूर्ण होण्या अगोदरच निवडणूक आयोगाने या बदल्या केलेल्या आहेत.

ज्या अधिकाऱ्यांचा कार्यकाळ पूर्ण झालेला आहे. त्यांच्या बदल्या करण्यात याव्यात परंतु ज्या अधिकाऱ्यांना फक्त पाच-दहा महिने झालेले आहेत. यांच्या बदल्या करू नयेत अशी नागरिकांची, कामगारांची, उद्योजकांची मागणी आहे.

चाकण औद्योगिक वसाहतीतील चाकण, महाळुंगे ही दोन पोलीस ठाणी अगदी संवेदनशील आहेत. या दोन्ही पोलीस ठाण्याच्या हद्दीत सुमारे दहा लाखावर लोकसंख्या आहे. दहा लाख लोकसंख्येसाठी असलेली ही दोन पोलीस ठाणे आहेत. त्यामुळे येथे असणारा वरिष्ठ पोलीस अधिकारी हा कार्यक्षम असणे महत्त्वाचे आहे.

चाकण परिसरात औद्योगिक वसाहत आहे. त्यामुळे तसेच वाढत्या रहिवासी संख्येमुळे, देशातून विविध राज्यातून येणाऱ्या कामगार वर्गामुळे विविध राज्यातून येणाऱ्या काही गुन्हेगारामुळे येथे विविध गुन्ह्याची संवेदनशीलता वाढलेली आहे. गुन्हेगारांचे प्रमाणही वाढलेले आहे. त्यामुळे गुन्ह्यांची संख्याही मोठी आहे. मोठ्या घरफोडीपासून खून, हाणामाऱ्या, वादावादी, भांडणे, आंदोलने आदी घटना मोठ्या प्रमाणात सातत्याने येथे घडत असतात.

अवैध धंदे ही वाढले जातात यावर अंकुश ठेवण्यासाठी वरिष्ठ पोलीस निरीक्षक कार्यक्षम असणे गरजेचे आहे. दोन्ही पोलीस ठाण्यांतर्गत येणारे वरिष्ठ पोलीस निरीक्षक अधिकारी सक्षम आणि कार्यक्षम आहेत. दोघांनी पदभार स्वीकारल्यानंतर मोठ्या प्रमाणात गुन्ह्यांची उकल झालेली आहे. काही गुन्हेगारांवर तडीपार, मोका व इतर कारवाया केल्या आहेत.

त्यामुळे गुन्हेगारांचे धाबे ही दणाणले आहे. चाकणचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक कदम यांचा कारभार ही योग्य आहे. त्यांनी विविध योजनांची अंमलबजावणी सुरू केली आहे. ते सक्षम व कार्यक्षम अधिकारी आहेत. तसेच, महाळुंगे पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक बाबर यांना गुणवत्ता पुर्ण सेवेसाठी राष्ट्रपतीचे पोलीस पदक नुकतेच मिळाले आहे.या दोन्ही पोलीस अधिकाऱ्यांचा चाकण औद्योगिक वसाहतीत त्यांच्या कार्यक्षमतेमुळे दबदबा आहे.

सर्वसामान्य माणसाला न्याय मिळत असल्याने सर्वसामान्य माणूसही समाधानी आहे असे चित्र आहे. पोलीस अधिकाऱ्यांचा गुन्हेगारावर वचक आहे. त्यामुळे त्यांना लोकसभा, विधानसभा निवडणूक होईपर्यंत या पोलीस ठाण्यातच राहून द्यावे, बदली रद्द करावी असे नागरिक, कामगार, उद्योजकांचे म्हणणे आहे.

दोन्ही पोलीस अधिकाऱ्यांना बदल्यांचे आदेश अद्याप प्राप्त झालेले नाहीत. निवडणूक आयोग पिंपरी- चिंचवड पोलीस आयुक्त, राज्याचे पोलीस महासंचालक काय निर्णय घेतात याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. या दोन्ही अधिकाऱ्यांच्या बदल्या मात्र रद्द कराव्यात अशी मागणी होत आहे.

सत्ताधारी पक्षाचे काही पदाधिकारी,कार्यकर्ते आपली कामे अधिकाऱ्यांकडून होत नाही. आपल्या मर्जीनुसार होत नाहीत त्यामुळे अगदी वरिष्ठ अधिकारी, मंत्र्यांना पोलीस अधिकाऱ्यांच्या, इतर अधिकाऱ्यांच्या बदल्या बाबतीत निवेदन देतात. त्यामुळे आकसाने काहींच्या बदल्या होत असतात. याकडे वरिष्ठ अधिकारी, मंत्री यांनी दुर्लक्ष करावे अशी मागणी ही नागरिक, कामगार, उद्योजक यांची आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com