esakal | दौंड मालधक्क्यातून पहिल्यांदाच खतांची वाहतूक
sakal

बोलून बातमी शोधा

Fertilizer-Transport-Daund

बोरीबेल (ता. दौंड) येथे दौंड शुगर लिमिटेड या खासगी साखर कारखान्याजवळील एक खत निर्मिती कंपनी मळी पासून पालाश (पोटॅश) चे उत्पादन करते. पहिल्यांदाच जुलै महिन्यात दौंड रेल्वे मालधक्क्यातून नागपूर जवळील कन्हान जंक्शन येथे या खताची वाहतूक करण्यात आली. सोलापूर विभागाचे वरिष्ठ परिचालन अधिकारी प्रवींद्र वंजारी यांच्या पुढाकारामुळे २१ वॅगन मधून एकूण १३२९ क्विंटल पालाशची वाहतूक करण्यात आली. रेल्वेला त्यापोटी १५ लाख ७७ हजार रूपयांचे उत्पन्न मिळाले.

दौंड मालधक्क्यातून पहिल्यांदाच खतांची वाहतूक

sakal_logo
By
प्रफुल्ल भंडारी

दौंड (पुणे) - दौंडच्या रेल्वे मालधक्क्यात नेहमी खतांच्या गोण्या उतरविल्या जातात. परंतु दौंड तालुक्यात उत्पादित पालाश खताची दौंड येथून विदर्भातील कन्हान जंक्शन येथे वाहतूक सुरू झाली आहे. 

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

बोरीबेल (ता. दौंड) येथे दौंड शुगर लिमिटेड या खासगी साखर कारखान्याजवळील एक खत निर्मिती कंपनी मळी पासून पालाश (पोटॅश) चे उत्पादन करते. पहिल्यांदाच जुलै महिन्यात दौंड रेल्वे मालधक्क्यातून नागपूर जवळील कन्हान जंक्शन येथे या खताची वाहतूक करण्यात आली. सोलापूर विभागाचे वरिष्ठ परिचालन अधिकारी प्रवींद्र वंजारी यांच्या पुढाकारामुळे २१ वॅगन मधून एकूण १३२९ क्विंटल पालाशची वाहतूक करण्यात आली. रेल्वेला त्यापोटी १५ लाख ७७ हजार रूपयांचे उत्पन्न मिळाले.

पुण्याचे जिल्‍हाधिकारी राम यांची पंतप्रधान कार्यालयात बदली; उपमुख्यमंत्र्यांनी दिल्या शुभेच्छा 

मुख्य वाणिज्य निरीक्षक बेट्टी आॅगस्टीन, मुख्य मालवाहतूक पर्यवेक्षक संजय काकडे, वाणिज्य निरीक्षक सतीश सोनोने यांच्या संयुक्त प्रयत्नांमधून जुलै महिन्यात ५३२८ क्विंटल साखरेची वाहतूक करण्यात आली. साखर वाहतूक पोटी एकूण ०१ कोटी ०६ लाख ७५ हजार ६८७ रूपयांचे उत्पन्न मिळाले. 

अखेर शाळेनं घेतलं नमतं; ब्लॉक केलेल्या 'त्या' विद्यार्थ्यांचं शिक्षण झालं सुरू!

पश्चिम महाराष्ट्रातून संकलित केलेले दूध दौंड येथून दिल्ली येथील हजरत निजामुद्दीन रेल्वे स्थानक येथे पाठविण्यात आले. या दुधाच्या वाहतुकीतून रेल्वेला भाडेपोटी एकूण २० लाख २३ हजार २७५ रूपयांचे उत्पन्न मिळाले आहे. तर दौंड रेल्वे स्थानकास जुलै महिन्यात एकूण १ कोटी ७४ लाख ९०० रूपयांचे उत्पन्न मिळाले आहे, अशी माहिती दौंड रेल्वे स्थानक व्यवस्थापक सॅम्यूएल क्लिफ्टन व वाहतूक निरीक्षक आर. बी. सिंग यांनी ही दिली. 

बिहार ला दररोज साडेबारा टन फळे व भाजी
मार्च महिन्यापासूनच्या लॅाकडाउन नंतर काही निर्बंध शिथिल झाल्यानंतर १ जून रोजी निवडक दहा प्रवासी गाड्या दौंड रेल्वे स्थानकावरून जात आहेत. त्यापैकी पुणे - दानापूर या प्रवासी गाडीतून नाशवंत मालाची वाहतूक करण्याकरिता वरिष्ठ वाणिज्य व्यवस्थापक प्रदीप हिरडे यांच्या मार्गदर्शनाखाली रेल्वे अधिकार्यांनी संबंधित हुंडेकरी यांच्याशी चर्चा केल्यानंतर दौंड येथून लिंबू, ढोबळी मिरची (कॅप्सिकम), सीताफळ, फुलकोबी (फ्लॅावर) व माशांची वाहतूक सुरू झाली. जुलै महिन्यात या नाशवंत मालाच्या वाहतुकीपोटी रेल्वेला ११ लाख ०४ हजार रूपयांचे उत्पन्न मिळाले आहे.

Edited By - Prashant Patil