
पुणे शहरातील मध्यवर्ती भागांत प्रवाशांना दहा रुपयांत दिवसभर पीएमपीच्या वातानुकूलित (एसी) बसमधून प्रवास करता येणार आहे. त्यासाठी महापालिकेच्या स्थायी समितीने मंगळवारी ठराव मंजूर केला.
पुणे - शहरातील मध्यवर्ती भागांत प्रवाशांना दहा रुपयांत दिवसभर पीएमपीच्या वातानुकूलित (एसी) बसमधून प्रवास करता येणार आहे. त्यासाठी महापालिकेच्या स्थायी समितीने मंगळवारी ठराव मंजूर केला. त्यासाठी आता ५० बसची खरेदी झाल्यावर मध्य भागात प्रवाशांना माफक दरात बस प्रवासाची सुविधा मिळणार आहे.
- ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप
- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा
शहराच्या मध्यभागात दिवसभर प्रवास १० रुपयांत उपलब्ध करून देण्याची घोषणा गेल्यावर्षीच अर्थसंकल्पात अध्यक्ष हेमंत रासने यांनी केली होती. परंतु, कोरोनामुळे या उपक्रमाची अंमलबजावणी करता आली नव्हती. या पार्श्वभूमीवर येत्या दोन-तीन महिन्यांत १० रुपयांत प्रवासाची सुविधा मिळणार आहे. या उपक्रमामुळे शहराच्या मध्य भागातील वाहतुकीची कोंडी कमी होईल. जास्तीत जास्त प्रवासी बसचा वापर करतील, अशी अपेक्षा असल्याचे रासने यांनी सांगितले.
काय सांगता! ट्रकपेक्षाही विमानाचं इंधन स्वस्त
या योजनेच्या अंमलबजावणीसाठी पहिल्या टप्प्यात ५० बस खरेदी करण्यात येणार असून, त्याकरिता १३ कोटी ४७ लाख रुपये इतका खर्च होणार आहे. महापालिकेच्या अंदाजपत्रकात त्यासाठी (२०२१-२२) आर्थिक तरतूद करण्यात आली आहे. तसेच नव्या बस खरेदीलाही बैठकीत मंजुरी देण्यात आली आहे, असे रासने यांनी सांगितले. पीएमपीने सुमारे तीन महिन्यांपूर्वी ५ रुपयांत प्रवासाची सुविधा शहराच्या मध्यवर्ती भागात आणि उपनगरांतील २३ मार्गांवर उपलब्ध करून दिली आहे. आता त्या योजनेच्या धर्तीवर १० रुपयांत दिवसभर प्रवासाची सुविधा प्रवाशांना मिळणार आहे.
Video: IPS कृष्ण प्रकाश यांची 'मन की बात'; मुळशी पॅटर्नचा केला 'अभ्यास'
वाहतुकीसाठी आराखडा तयार
दहा रुपयांत दिवसभर प्रवास ही सुविधा प्रवाशांना उपलब्ध करून देण्यासाठी पीएमपी प्रशासनाने आराखडा तयार केला आहे. त्यात सुमारे ३० मार्गांचा समावेश असेल. त्यावर नव्या एसी मिडी बसची वाहतूक करण्यात येईल. या साठी विशिष्ट थांबे असतील. ही बससेवा शटल स्वरूपात असू शकेल. क्वार्टर गेट ते टिळक चौक (अलका टॉकीज) अशा स्वरूपाचा मार्ग असू शकेल. कष्टकरी, विद्यार्थी, ज्येष्ठ नागरिक, नोकरदार यांना ही बससेवा उपयुक्त ठरू शकेल, असे पीएमपीच्या वाहतूक विभागातील अधिकाऱ्यांनी सांगितले.
Edited By - Prashant Patil