प्रत्येक रुग्णाला उपचार अन्‌ बेडही

Administrative-Preparation
Administrative-Preparation

पुणे - कोरोनाच्या प्रत्येक रुग्णाला योग्य उपचार मिळतील. प्रत्येक गरजू रुग्णाला उपचारासाठी डॉक्‍टर, रुग्णालयात बेड, ऑक्‍सिजन आणि इंजेक्‍शन्स मिळेल, अशा पायाभूत सुविधा उभारण्यात येत आहेत.

शहर आणि जिल्ह्यात आठ-दहा दिवसांपासून कोरोनाबाधीत रुग्णांची संख्या महिन्याभरानंतर हजाराच्यावर गेली आहे. त्यामुळे ऑगस्ट आणि सप्टेंबरप्रमाणे रुग्णांची संख्या झपाट्याने वाढल्यास व्यवस्थापन कसे करता येईल, याबद्दल प्रशासन पावले उचलत आहे.

- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

यात प्रत्येक कोरोनाबाधीताला प्रभावी उपचार मिळेल, अशी सुविधा उभारण्यावर प्रशासनाने भर दिला आहे. त्यासाठी रुग्णालयातील बेड, ऑक्‍सिजन बेड, अतिदक्षता विभाग, व्हेंटिलेटरची व्यवस्था केली जात आहे. 

जास्तीत जास्त किती रुग्ण आढळतील?
पुण्यात सप्टेंबरमध्ये सर्वाधिक कोरोनाच्या सक्रिय रुग्णांची संख्या होती. त्यात दहा टक्‍क्‍यांनी वाढ होईल, अशी शक्‍यता गृहीत धरली आहे. त्यामुळे पुण्यात एका दिवशी १९ हजार ५०० रुग्णांवर उपचार कसे केले जातील, याबाबत प्रशासन आरोग्याच्या पायाभूत सुविधा उभारत आहे.

अशी असेल ऑक्‍सिजनची व्यवस्था
पुणे विभागात तीन कंपन्यांमधून दररोज २७३ मेट्रिक टन ऑक्‍सिजन उत्पादन होत होते. ती क्षमता आता ३७३ मेट्रिक टनापर्यंत वाढविण्यात आली. त्यासाठी शंभर मेट्रिक टनच्या एका ऑक्‍सिजन उत्पादक कंपनीला परवाना देण्यात आला आहे. त्यामुळे पुरेशा प्रमाणात ऑक्‍सिजन उपलब्ध असेल, असा विश्वास अन्न व औषध प्रशासनाचे सहआयुक्त (औषध) एस. बी. पाटील यांनी सांगितले.

पुणे विभागाची रोजच्या ऑक्‍सिजनची गरज १५० मेट्रिक टनची आहे. यापूर्वी पुणे जिल्ह्याची दररोजच्या ऑक्‍सिजनची मागणी २२० मेट्रिक टन होती. ती आता ९६ मेट्रिक टनापर्यंत कमी झाली.
- एस. बी. पाटील, सहआयुक्त, एफडीए, पुणे विभाग

रुग्णसंख्या वाढल्यास किती कोविड केअर सेंटर्सची गरज पडेल, ऑक्‍सिजन बेड किती लागतील, व्हेंटिलेटर्स किती रुग्णांना लागू शकतो, याची तयारी पूर्ण झाली आहे. कोरोनाची संभाव्य दुसरी लाट आल्यास प्रत्येक रुग्णाला वेळेत योग्य उपचार मिळतील.
- डॉ. संजीव वावरे, सहायक आरोग्य प्रमुख, महापालिका

Edited By - Prashant Patil

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com