पुण्यातील वृक्षरोपणाचा पॅटर्न आता केनियातही होणार सुरू

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 29 जून 2020

पुणे शहराच्या हिरवाईला जपण्याचा पुढाकार आता शहरातील युवकांनी घेतला आहे. फर्ग्युसन महाविद्यालयातील हे माजी विद्यार्थी शहरातील विविध टेकड्यांवर वेगवेगळ्या देशी वनस्पती प्रजातींचे रोपे लावत आहेत. यासाठी या विद्यार्थ्यांच्या वतीने 'परिषकर्णम इको सिस्टम्स'या संस्थेची स्थापना करण्यात आली व 'आनंद साधना बहुउद्देशीय संस्था यांच्या सहकार्याने या उपक्रमास सुरुवात केली आहे.

पुणे - पुणे शहराच्या हिरवाईला जपण्याचा पुढाकार आता शहरातील युवकांनी घेतला आहे. फर्ग्युसन महाविद्यालयातील हे माजी विद्यार्थी शहरातील विविध टेकड्यांवर वेगवेगळ्या देशी वनस्पती प्रजातींचे रोपे लावत आहेत. यासाठी या विद्यार्थ्यांच्या वतीने 'परिषकर्णम इको सिस्टम्स'या संस्थेची स्थापना करण्यात आली व 'आनंद साधना बहुउद्देशीय संस्था यांच्या सहकार्याने या उपक्रमास सुरुवात केली आहे. तसेच या उपक्रमाला केनियातील पर्यावरण प्रेमी अंमलात आणणार असल्याचे संस्थेतर्फे सांगण्यात आले.

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

या बाबत माहिती देताना संस्थेतील अक्षय पतंगे म्हणाला,"शहरात पूर्वी सगळीकडे हिरवाई होती. जागो जागी देशी झाडांच्या प्रजात्या उपलब्ध होत्या. परंतु वाढत असलेल्या शहरीकरणामुळे या झाडांना तोडण्यात आले. एकीकडे प्रदूषणाचा स्रोत वाढत आहे तर त्या प्रदूषणाला कमी करणाऱ्या झाडांची संख्या कमी होत आहे. तसेच येणाऱ्या पिढीला पण शहरात केवळ हिरवाई अनुभवता यावी या हेतूने वर्तमानात हे रोपे लावण्याचे कार्य करत आहोत. या उपक्रमाच्या अंतर्गत दिघी येथील दत्तगडच्या पायथ्यावरही आम्ही वृक्षारोपण केले आहे. यासाठी ग्रामस्थांनी सुद्धा या कार्यात सहभाग घेतला होता. या उपक्रमात आठ स्वयंसेवकांनी सहभाग घेतला असून यामध्ये मयूर तम्हाणे, सौरभ लांडगे, शुभम गुजर, सिद्धार्थ खोपडे आदींचा समावेश आहे. तसेच सध्या संस्थे तर्फे देशी वनस्पतींच्या प्रजाती शहरातील विविध भागांमध्ये लावण्यावर लक्ष केंद्रित केले जात आहे."

पुनर्वसन नको जिवनावश्यक सोयी-सुविधा द्या; आम्हाला स्वावलंबी जगू द्या

या उपक्रमाची दखल घेत केनिया या देशातूनही चांगला प्रतिसाद मिळत आहे. या उपक्रमातून प्रेरणा घेत केनियातील पर्यावरण प्रेमी आदिल सिद्दीक यांनी केनियामध्येही असा उपक्रम सुरू करणार असल्याचे सांगितले आहे. अशी माहिती स्वयंसेवक सागर शिंदे यांनी दिली. 

एक हजार वृक्षरोपन करण्याचा प्रयत्न
या उपक्रमाच्या माध्यमातून संस्थे तर्फे एक हजार वृक्षरोपन करण्याचा प्रयत्न केला जात आहे. शहरातील प्रत्येक भागांमध्ये ही रोपे लावली जातील. परंतु या कामासाठी जास्तीत जास्त स्वयंसेवकांची गरज लागणार असून यामध्ये नागरिकांनी सहभाग घ्यावा असे आवाहन संस्थे तर्फे करण्यात आले आहे. 

प्रदेशाध्यक्षांच्या उपस्थितीत पुण्यात आंदोलन; नगरसेवक आणि पदाधिकाऱ्यांची दांडी

"आपण झाडांची संख्या यावर भर न देता या रोपांची गुणवत्ता आणि अधिकाधिक वृक्षारोपण यावर विशेष लक्ष दिले पाहिजे. कमी संख्येने झाडे लावा परंतु त्यांची काळजी घेत असल्याचे सुनिश्चित करा."
- किम्बरले कोलाको, स्वयंसेवक

"युवक म्हणून आज आपण या देशाचे करते धरते आहोत. तसेच येणाऱ्या भविष्याला घडविण्याची जबाबदारी युवकांवर आहे. त्यामुळे पर्यावरणाला जपण्यासाठी सर्व युवकांनी एकत्रित येऊन अश्या प्रकारचे कार्य केले पाहिजेत."
- श्रद्धा शिगवण, स्वयंसेवक

- पर्यावरणाची हिरवाई जपण्यासाठी युवकांचा पुढाकार
- विविध टेकड्यांवर लावत आहेत झाडे
- त्यांच्या उपक्रमास मिळत आहे केनिया देशातूनही प्रतिसाद


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: The tree planting pattern in Pune will now start in Kenya as well