पुनर्वसन नको जिवनावश्यक सोयी-सुविधा द्या; आम्हाला स्वावलंबी जगू द्या

Provide essential amenities demand Padarwadi villagers in Pune District
Provide essential amenities demand Padarwadi villagers in Pune District

चास, पदरवाडी (ता. खेड) : या निसर्गसौंदर्याने नटलेल्या गावातील नागरिकांनी प्रशासनाला आर्त हाक दिली असून आमचे पुनर्वसन नको तर आम्हाला जिवनावश्यक सुवीधा द्या, म्हणजे आमच्या रोजगारात वाढ होवून आम्हाला स्ववलंबी जिवन जगता येईल.

पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे  क्लिक करा

खेड तालुक्याच्या पश्चिम पट्यातील सह्याद्रिच्या डोंगररांगात व आंबेगाव, कर्जत, मुरबाड तालुक्याच्या शिवेवर वसलेले, स्वर्गाचा अनुभूती देणारी निसर्ग सौंदर्याने नटलेली शंभर टक्के आदिवासी वस्ती असलेली पदरवाडी म्हणजे निसर्गाचा अद्भुत खजीना आहे. खेड तालुक्याचे पवित्र ठिकाण श्री भिमाशंकर मंदिराच्या डोंगराच्या पायथ्याशी सुमारे तीन कि. मी. खोल दरीत भिमाशंकर अभयारण्याच्या कुशीत वसलेली पदरवाडी कि जेथे तेरा ते पंधरा घरे व सुमारे एकाहत्तर लोकसंख्येची वाडी सुमारे दिडशे वर्षांपेक्षा अधिक काळापासून वसलेली आहे. येथील नागरिकांचे उपजिवीकेचे साधन म्हणजे परंपरागत शेती हे असून त्यावरच ते आपली उपजिवीका करतात.
-----------
'या' देशाचा भारताला पाठिंबा; हिंद महासागरामध्ये केला एकत्रित युद्धसराव
-----------
सुरक्षा दलाकडून सर्च ऑपरेशन : अनंतनागमध्ये ३ दहशतवाद्यांचा खात्मा
-----------
या गावाला जाण्यासाठी आजही मुख्य रस्ता व हक्काची पाऊलवाट नसून आजही या गावात लाईट नाही. डोंगरातून असलेली अवघड पायवाट तुडवत त्यांनी शासनाबरोबरच विवीध संस्थाशी संपर्क साधत मदतीची व सोयीसुविधा पुरवण्याची मागणी केली. त्यांच्या या हाकेला शासनाने नाही पण कमीन्स कंपनी पुणे यांनी गावासाठी मोठा जनरेटर उपलब्ध करून दिला मात्र तो गावात नेण्यासाठी गाडीरस्ता नसल्याने गावातील तरूणांनी जनरेटरचे भाग सुटे करून ते तीन कि.मी. डोंगराची उतरण उतरून खांद्यावरून हे साहित्य नेले त्यामुळे गावात पिढाची गिरणी, भाताची गिरणी तसेच भरडणी मशीन सुरू झाली, हॅबीडेड संस्था मुंबई यांच्या माध्यमातून प्रत्येक घरांसाठी सोलर सीस्टिम उभी राहिली तसेच शेळीपालन व कुटूंबासाठी साठ हजाराची मदत देण्यात आली तर महाराष्ट्र आरोग्य मंडळाच्या माध्यमातून पडकईची, शेती दुरूस्तीची कामे झाल्याने शेती करणे सोपे झाले.

या सर्वाचा तरूणांनी याचा फायदा घेत गेली काही वर्षांपासून येथील नयनरम्य निसर्गसंपदेचा अभ्यास करून या निसर्गाच्या खजिन्यात आपल्याला पर्यटन हा व्यवसाय विकसीत करता येईल हा विचार करत मोबाईलच्या माध्यमातून व विविध अॅपच्या साह्याने पदरवाडी जगाच्या नकाशावर आणली. हा व्यवसाय एवढा विकसीत झाला कि या गावात मुंबई, हैद्राबाद, नाशिक, पुणे, जळगांव येथील पर्यटक येण्यास सुरूवात झाली व बघता बघता पर्यटन हा येथील नागरिकांचा मुख्य व्यवसाय बनला. मात्र, पदरवाडी हि डोंगराच्या पायथ्याशी असल्याने माळीणसारखी दुर्घटना व्हायला नको म्हणून या वाडीचे भिमाशंकर येथे पुनर्वसन करण्याचा शासनाचा विचार सुरू झाल्याने येथील नागरिक धास्तावले आहेत. आमची शेतजमीन येथे, निसर्गाचा आस्वाद घेण्यासाठी येणारे पर्यटक व त्यातून होणारा रोजगार येथे असेल तर आमचे पुनर्वसन करून काय उपयोग त्यापेक्षा आमच्या जिवनावश्यक गरजा यामध्ये लाईट, पाणी, रस्ता या जिवनावश्यक सोयी द्या आमचे जिवन सुखकर होईल अशी भावना येथील भानुदास दिवाळे, गोविंद डामसे, कुंडलीक हांडे, दुंदा काठे, रामचंद्र हिले, मिराबाई दिवाळे, गणेश दिवाळे यांनी दै. सकाळकडे बोलून दाखवली. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com